Smuggling News l गुजरातमधील महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) संयुक्त कारवाईत मोठा खुलासा झाला आहे. अहमदाबादमधील एका फ्लॅटवर छापा टाकून 87.9 किलो सोने, 11 महागड्या घड्याळ्या आणि कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढी मोठी रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली. या संपत्तीचा मालक कोण? याचा तपास सुरू आहे.
100 कोटींचे सोने आणि आंतरराष्ट्रीय तस्करीचा संशय :
अधिकाऱ्यांनी अहमदाबादच्या पालडी भागातील एका फ्लॅटवर छापा टाकला असता तब्बल 100 कोटी रुपयांचे सोने सापडले. त्यातील 19.6 किलो सोन्याचे दागिने होते. बहुतांश सोन्यावर विदेशी चिन्ह असल्याने ते तस्करीद्वारे भारतात आणल्याचा संशय आहे. सोबतच 1.37 कोटींची रोकड आणि 11 महागड्या घड्याळ्याही जप्त करण्यात आल्या.
ही संपत्ती नेमकी कोणाची आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. छापेमारी झालेला फ्लॅट मेघ शाह यांनी भाड्याने घेतला होता. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय दुबईत असून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करतात. पोलिसांचा संशय आहे की, हे आर्थिक व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून केले गेले असावेत.
Smuggling News l छापा टाकताना कुलूप आणि नातेवाईकांचा शोध :
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर अधिकाऱ्यांनी या फ्लॅटवर छापा टाकला. मात्र, त्यावेळी फ्लॅटला कुलूप होते. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी शाह यांच्या एका नातेवाईकांकडून चावी घेतली आणि फ्लॅट उघडला. त्या नातेवाईकांचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे.
ही संपत्ती आंतरराष्ट्रीय तस्करीशी संबंधित आहे का, याचा तपास डीआरआयकडून करण्यात येत आहे. गुजरात एटीएसने संपूर्ण प्रकरण महसूल गुप्तचर संचालनालयाकडे सोपवले असून पुढील कारवाई सुरू आहे.
News title : Gold Smuggling Racket Busted: 87.9 Kg Gold, Cash, and Luxury Watches Seized in Gujarat Raid








