Gold-Silver Rate Today | गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. सोमवारी आणि मंगळवारी सोन्यात मोठी वाढ नोंदवली गेली. तर बुधवारी किंमतीत घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात देखील सोन्याने माघार घेतली असल्याचं चित्र आहे. याउलट, चांदीच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. (Gold-Silver Rate Today)
22K आणि 24K सोन्याचे नवीन दर
गुडरिटर्न्सच्या (GoodReturns) अहवालानुसार, सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 80,350 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87,640 रुपये आहे.
मागील आठवड्यात 5,000 रुपयांनी घसरलेली चांदी आता पुन्हा वाढत आहे. सोमवारी आणि बुधवारी प्रत्येकी 1,000 रुपयांची वाढ झाल्याने एक किलो चांदीचा दर 99,000 रुपये पर्यंत पोहोचला आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे दर (IBJA अनुसार)
- 24 कॅरेट: ₹85,876 प्रति 10 ग्रॅम
- 23 कॅरेट: ₹85,532 प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट: ₹78,662 प्रति 10 ग्रॅम
- 18 कॅरेट: ₹64,407 प्रति 10 ग्रॅम
- 14 कॅरेट: ₹50,238 प्रति 10 ग्रॅम
- एक किलो चांदी: ₹96,460
घरबसल्या सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या
ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन रोजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज हे दर जाहीर करते. (Gold-Silver Rate Today)
Title : Gold-Silver Rate Today 7 March 2025






