सोन्याची रॉकेट भरारी, किमती ऐकून ग्राहकांना फुटला घाम

On: March 6, 2025 9:28 AM
Gold-Silver Price Today 6 March 2025 
---Advertisement---

Gold-Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून, चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या संभाव्य धोरणामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे सोन्याकडे वाढते आकर्षण पाहायला मिळत आहे. (Gold-Silver Price Today)

सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ

सोन्याच्या किंमतींनी या आठवड्यात झेप घेतली असून, सोमवारी 760 रुपये आणि मंगळवारी 600 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 80,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 88,130 रुपये झाला आहे.

चांदीच्या दरात अस्थिरता

गेल्या आठवड्यात चांदी 5,000 रुपयांनी स्वस्त झाली होती. मात्र, या आठवड्यात किंमत 1,000 रुपयांनी वाढली. सध्या एक किलो चांदीचा दर 98,000 रुपये आहे.

14K ते 24K सोन्याचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार,

  • 24 कॅरेट: 86,300 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 23 कॅरेट: 85,954 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: 79,051 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 18 कॅरेट: 64,725 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 14 कॅरेट: 50,486 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चांदी: 95,993 रुपये प्रति किलो

घरबसल्या जाणून घ्या दर

सोने-चांदीच्या किंमती घरबसल्या जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे दर जाहीर करते, मात्र शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी दर अपडेट होत नाहीत. (Gold-Silver Price Today)

Title : Gold-Silver Price Today 6 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now