गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं महागलं, काय आहेत आजचे दर?; जाणून घ्या

On: March 27, 2025 10:45 AM
Gold-Silver Price Today 27 March 2025 
---Advertisement---

Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत सलग दोन दिवस घसरण झाल्यानंतर आज पुन्हा दर वाढले आहेत. 27 मार्च 2025 रोजी 18K, 22K आणि 24K सोन्याच्या दरात वाढ झाली असून, चांदीनेही हजारो रुपयांची उसळी घेतली आहे.   (Gold-Silver Price Today )

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, घसरणीला विराम

गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 210 आणि 330 रुपयांची घसरण नोंदली गेली होती, त्यामुळे सोनं एकूण 540 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र बुधवारी सोन्याने पुन्हा भरारी घेत 110 रुपयांची वाढ केली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)ने दिलेल्या ताज्या दरांनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोनं 87,791 रुपयांवर, 23 कॅरेट 87,439 रुपयांवर आणि 22 कॅरेट सोनं 80,417 रुपयांवर पोहोचलं आहे. याशिवाय, 18 कॅरेट सोनं 65,843 रुपये आणि 14 कॅरेट सोनं 51,358 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने विकले जात आहे.

चांदीत जोरदार उसळी, जळगावात दर वाढले

21 मार्चपासून चांदीच्या दरात मोठी घट झाली होती. या कालावधीत चांदी 4100 रुपयांनी स्वस्त झाली होती. मात्र सोमवारी आणि मंगळवारी किंमती स्थिर राहिल्यानंतर बुधवारी चांदीने 1000 रुपयांची वाढ नोंदवली.

IBJAने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एक किलो चांदीचा दर 98,794 रुपये इतका नोंदवला आहे. जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात चांदीच्या किंमतीत तब्बल 1,400 रुपयांची वाढ झाली असून ती 99,800 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. (Gold-Silver Price Today )

सोनेही 100 रुपयांनी महागलं असून त्याचा दर 88,200 रुपये प्रति तोळा झाला आहे. गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) तोंडावर हे दर वाढल्याने सणाच्या दिवशी किंमती किती वाढतील, याकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.

Title : Gold-Silver Price Today 27 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now