Gold-Silver Price Today | सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आजच ते एक लाखाचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, या महिन्यात सोने 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता आहे. चांदीही मागे नाही, तिच्या दरातही मोठी वाढ होत आहे. (Gold-Silver Price Today)
मार्चपासून सोन्यात विक्रमी वाढ
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर आकाशाला भिडत आहेत. मार्चपासून सुरू झालेली वाढ अजूनही कायम आहे. याच आठवड्यात 16 एप्रिल रोजी सोने तब्बल 990 रुपयांनी वाढले, तर 17 एप्रिलला 1140 रुपयांनी दर वधारले. गुडरिटर्न्सनुसार, सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 89,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेटचा दर 97,460 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
जळगाव येथील सराफा बाजारातही जीएसटीसह सोन्याची किंमत 97 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे शंभरी पार करण्यासाठी सोन्याला आता फार मोठी झेप उरलेली नाही. बाजारातील चढत्या किंमती पाहता, गुंतवणूकदार आणि खरेदीदार या दरांच्या हालचालींकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
चांदीच्या दरात झपाट्याने वाढ
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मार्चपासून सतत वाढ होत आहे. आठवड्याभरात चांदी 200 रुपयांनी महागली असून, एका किलो चांदीचा दर आता 1,00,000 रुपयांवर पोहचला आहे. ही दरवाढ काहीशा चढ-उतारानंतरही कायम असून गुंतवणूकदारांमध्ये यावरूनही उत्सुकता निर्माण झाली आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने जाहीर केलेल्या सकाळच्या सत्रातील दरांनुसार, 24 कॅरेट सोने 94,910, 23 कॅरेट 94,530, 22 कॅरेट 86,938, 18 कॅरेट 71,183 आणि 14 कॅरेट सोने 55,522 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने उपलब्ध आहे. चांदीच्या किलोचा दर सध्या 95,151 रुपये आहे. वायदे व आंतरराष्ट्रीय बाजारात करमुक्त व्यवहार होत असल्यामुळे स्थानिक बाजाराच्या तुलनेत किंमतीत थोडा फरक दिसतो.
Title : Gold-Silver Price Today 18 april 2025






