ग्राहकांच्या खिशाला कात्री! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोनं सुसाट; पाहा किती हजारांनी महागलं?

On: January 2, 2026 11:35 AM
Today Gold Rate
---Advertisement---

Today Gold Rate | नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात होताच सोने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने नव्या वर्षात दर कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे अनेक ग्राहक स्वस्तात दागिने खरेदीसाठी वाट पाहत होते. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून, बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Silver Rate Today)

२ जानेवारी २०२६ रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे, सोने महागले असताना चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. (24 Carat Gold Price)

24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ:

शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १०० ग्रॅम तब्बल ११,४०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १३,५०,६०० रुपयांवरून थेट १३,६२,००० रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३५,०६० रुपयांवरून वाढून १,३६,२०० रुपये इतका झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली आणि बारामती या प्रमुख शहरांमध्ये समान दर नोंदवण्यात आले आहेत.

२२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १०० ग्रॅम १०,५०० रुपयांची वाढ झाली असून, १०० ग्रॅम सोन्याचा दर १२,३८,००० रुपयांवरून १२,४८,५०० रुपये झाला आहे. तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,२३,८०० रुपयांवरून वाढून १,२४,८५० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे लग्नसराई आणि दागिने खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Today Gold Rate | चांदी स्वस्त, पुढील काळाबाबत अंदाज :

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ कायम असून, प्रति १०० ग्रॅम ८,६०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे १८ कॅरेट सोन्याचा १०० ग्रॅम दर १०,१२,९०० रुपयांवरून १०,२१,५०० रुपये झाला आहे. तर १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा दर १,०१,२९० रुपयांवरून वाढून १,०२,१५० रुपये झाला आहे. सर्व कॅरेटमध्ये दरवाढ झाल्याने सोन्याचा बाजार तेजीत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Today Gold Rate)

सोन्याच्या दरात तेजी असताना चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचा दर कमी होऊन २,३७,९०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्याच्या घडीला सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचल्याने ग्राहकांनी खरेदीपूर्वी दरांची तुलना करणे आवश्यक ठरत आहे.

News Title: Gold Rate Today: Big Jump in Gold Prices at the Start of 2026, Check Today’s City-wise Rates

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now