सोनं-चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे दर

On: June 1, 2026 2:46 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate | जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये लक्षणीय घट झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) तसेच देशातील सराफा बाजारात आज सकाळपासूनच नरमाईचे वातावरण दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफावसुलीचा परिणाम दरांवर झाल्याचे सांगितले जात आहे.

आजच्या व्यवहारात सोन्याच्या किंमतीत तब्बल 1,500 रुपयांहून अधिक घसरण झाली, तर चांदीचे दरही खाली आले. त्यामुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांचे लक्ष या बदलाकडे लागले आहे.

MCX आणि सराफा बाजारात घसरण :

एमसीएक्सवरील 5 ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचा दर मागील व्यवहारात प्रति 10 ग्रॅम 1,60,911 रुपयांवर बंद झाला होता. मात्र आजच्या सत्राची सुरुवात 1,60,193 रुपयांवर झाली आणि त्यानंतर दरात सतत घसरण होत 1,59,350 रुपयांपर्यंत मजल गेली. सकाळी सुमारे 9.55 वाजता सोने 1,59,701 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने व्यवहार करत होते.

चांदीच्या बाजारातही अशीच स्थिती दिसून आली. सकाळी 9.55 वाजता चांदीचा दर 2,66,540 रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. स्थानिक सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 820 रुपयांनी घसरून 1,56,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. 22 कॅरेट सोन्याची किंमत 750 रुपयांनी कमी होऊन 1,43,200 रुपये झाली, तर 18 कॅरेट सोने 610 रुपयांनी स्वस्त होत 1,17,170 रुपयांवर पोहोचले. किरकोळ बाजारात चांदीचा दर सध्या सुमारे 2.80 लाख रुपये प्रति किलो आहे.

Gold Rate | प्रमुख शहरांतील ताजे भाव :

देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. दिल्ली (Delhi), लखनऊ (Lucknow) आणि जयपूर (Jaipur) येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,370 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,43,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई (Mumbai) आणि कोलकाता (Kolkata) येथे 24 कॅरेट सोने 1,56,220 रुपये आणि 22 कॅरेट सोने 1,43,200 रुपये दराने विकले जात आहे. चेन्नई (Chennai) मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,58,180 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,45,000 रुपये आहे. पटना (Patna) येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,270 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,43,250 रुपये आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 15,829 रुपये इतका नोंदवला गेला आहे. 10 ग्रॅमसाठी हा भाव 1,58,290 रुपये असून मागील दिवसाच्या तुलनेत 600 रुपयांची घट झाली आहे. 100 ग्रॅम सोन्याचा दर 15.82 लाख रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या बाबतीत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, जयपूर आणि लखनऊसह अनेक शहरांमध्ये दर 2.80 लाख रुपये प्रति किलो आहे.

News Title: Gold And Silver Prices Fall

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now