सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; तरुणीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

On: January 22, 2025 10:49 AM
Beed Crime
---Advertisement---

Pune News l सोशल मीडियाद्वारे (Social Media) ओळख झाल्यानंतर निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

इतकेच नव्हे तर प्रियकराने तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ (Videos) आणि फोटो (Photos) काढून ते व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत, तिला त्याच्या मित्रासोबतही शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवण्यास भाग पाडले.

या प्रकरणी पीडित तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी अवघ्या १७ वर्षे सहा महिन्यांची असताना तिची आरोपीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले. भेटीदरम्यान आरोपीने पीडित तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Pune News l व्हिडिओ, फोटो काढून ब्लॅकमेलिंगचा (Blackmailing) प्रकार

आरोपीने पीडितेसोबतच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ आणि फोटो गुपचूपपणे काढले. त्यानंतर त्याने हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमकीला घाबरून तरुणीने आरोपीच्या मित्रासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास होकार दिला, असा आरोप आहे.

अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे (Amol More) तपास करत आहेत.

News Title l Girl Raped by Boyfriend and His Friend After Getting Acquainted on Social Media

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now