Girish Mahajan | 1 जूनरोजी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.उद्या 4 जूनरोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.देशात भाजप विरुद्ध इंडिया आघाडी असा राजकीय संघर्ष आहे.
निकाल लागण्यापूर्वीच विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आली आहे. काही मीडिया एक्झिट पोल्सनुसार, राज्यात महायुतीला फटका बसणार असल्याचं म्हटलं गेलंय. तर,महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार, असा अंदाज बांधण्यात आलाय.
“वाढती महागाई, शेतकरी प्रश्नामुळे महायुतीला फटका”
दुसरीकडे देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे दाखवले जात आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय. एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. मात्र किमान 35 जागा महायुतीला मिळतील, उद्या तुम्हाला ते पाहायला मिळेल,असं गिरीश महाजन (Girish Mahajan)म्हणाले आहेत.
यावेळी महाजन यांनी कमी जागा मिळण्याचं कारण देखील सांगितलं. काही ठिकाणी उमेदवार बदलायला पाहिजे होते, ते मात्र झालं नाही, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी होत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात कमी जागा येत आहेत, हे खरं आहे. यामागील महत्वाचं कारण म्हणजे वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षणाचा प्रश्न असल्याचं महाजन (Girish Mahajan) म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
दरम्यान, काही मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात (Exit Poll 2024 ) महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज दिला आहे. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य असल्याचं म्हटलं गेलंय. दुसरीकडे, मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज आणि शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
News Title : Girish Mahajan On Exit Poll
महत्वाच्या बातम्या-
खरचं रविना टंडनने मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केली? यासंदर्भात रवीना काय म्हणाली
उष्णतेपासून दिलासा मिळणार! हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
आयफोनला टक्कर देण्यासाठी रियलमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत






