Ghaziabad Crime | उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबाद (Ghaziabad) येथील एका पॉश सोसायटीमध्ये १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) मैत्री केल्यानंतर, एका तरुणाने त्याच्या तीन साथीदारांसह घरात घुसून मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना १३ जुलै रोजी दुपारच्या वेळी कवि नगर (Ghaziabad Crime) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित मुलगी घरात एकटी असताना, इन्स्टाग्रामवर मित्र बनलेल्या एका तरुणाने तिला भेटण्याच्या बहाण्याने कॉल केला. त्यानंतर तो त्याच्या तीन साथीदारांसह तिच्या फ्लॅटवर पोहोचला. चौघांनी मिळून मुलीला जबरदस्तीने खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
काही वेळाने पीडितेची आई बाजारातून परत आली, तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत गेल्यावर तिला चारही आरोपी मुलीच्या खोलीत दिसले. तिने प्रसंगावधान राखून घराचा दरवाजा आतून बंद केला आणि कुटुंबीयांना व पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
दोन आरोपींना अटक-
१४ जुलै रोजी पीडितेच्या (Ghaziabad Crime) वडिलांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या (POCSO Act) गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला. एसीपी भास्कर वर्मा (ACP Bhaskar Verma) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत लक्की (Lakki) आणि दीपराज (Deepraj) नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी तुषार (Tushar) आणि एका अल्पवयीन साथीदाराचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली असून, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
News Title – Ghaziabad crime rape After Instagram Friendship






