गौतमी पाटीलची खास इच्छा झाली पूर्ण, चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

On: March 31, 2025 9:50 AM
Gautmi Patil Car Accident
---Advertisement---

Gautami Patil | मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलनं चाहत्यांना एक खास आनंदाची बातमी दिली आहे. ‘कृष्ण मुरारी’ या नव्या गाण्याच्या माध्यमातून तिची एक खास इच्छा पूर्ण झाल्याचं गौतमीने सांगितलं असून, तिच्या या नव्या गाण्याच्या टीझरकडे चाहते उत्सुकतेने पाहत आहेत. (Gautami Patil)

‘कृष्ण मुरारी’च्या निमित्तानं पहिल्यांदाच गवळण सादर

नेहमीच आपल्या ठसकेबाज स्टेप्स आणि कातील अदांनी चाहत्यांची मनं जिंकणारी गौतमी पाटील (Gautami Patil) आता नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभमुहूर्तावर तिनं ‘कृष्ण मुरारी’ या गवळण प्रकारातील गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर असून, हे गाणं गायिका गायत्री शेलार यांनी सादर केलं आहे. विशाल शेलार (Vishal Shelar) यांनी याचे बोल लिहिले असून, दिग्दर्शन मनीष महाजन यांनी केलं आहे. संगीत संयोजन आदित्य पाटेकर आणि करण वावरे यांनी केले आहे.

गौतमी पाटीलनं आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, “लोकसंगीतात गवळण हा प्रकार मला खूपच आवडतो. अनेक दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती आणि ‘कृष्ण मुरारी’मुळे ती पूर्ण झाली. या गाण्याचं पोस्टर मी सोशल मीडियावर शेअर केलं असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. या गाण्याचा टीझर 3 एप्रिल 2025 ला प्रदर्शित होईल.”

फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय, चाहत्यांमध्ये कायमचा उत्साह

‘सबसे कातील गौतमी पाटील’ हे वाक्य प्रेक्षकांच्या मनात कोरले गेलेलं असून, तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी उसळते. वाद आणि चर्चांमध्ये राहूनही तिच्या लोकप्रियतेत घट नाही, उलट तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढते आहे. यापूर्वी ती एका चित्रपटात झळकली होती आणि आता ‘कृष्ण मुरारी’च्या निमित्तानं संगीतविश्वात एक वेगळं पाऊल टाकलं आहे.

तिच्या पहिल्या गवळण गीताच्या निमित्तानं तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच तिच्या पोस्टरला मिळालेला प्रतिसाद पाहता हे गाणं देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

Title : Gautami Patil Debuts in Gavlan Song ‘Krishna Murari’

 

Join WhatsApp Group

Join Now