Gas Cylinder Price | देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. जवळपास सर्वच ठिकाणी आता मतदानाचे टप्पे पार पडले आहेत. त्यामुळे सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. येत्या 4 जून रोजी निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला 4 जून नंतर मोठी झळ बसणार असल्याचं म्हटलं जातंय. निवडणुकांनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात निवडणुकांच्या आधी आणि नंतर घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत अनेकदा बदल नोंदवले गेले आहेत.
4 जूननंतर किंमती वाढणार की घटणार?
LPG सिलिंडरच्या किमती तशा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केल्या जातात. 1 जून 2014 मध्ये दिल्लीत विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 905 रुपये प्रति सिलिंडर होती. तर, अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 414 रुपये होती. आज 27 मे 2024 रोजी याच किमती 803 आणि 1745.50 रुपये आहेत.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये (Gas Cylinder Price ) विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 216 रुपयांनी कमी झाली होती. 2014 मध्ये 928.50 रुपये असलेली किंमत 2019 मध्ये 712 रुपये झाली. दुसऱ्या कार्यकाळात तोच सिलिंडर 712.50 रुपयांनी वाढून 1103 रुपयांवर पोहोचला आणि आता तो 803.50 रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच किंमत 91 रुपयांनी वाढली आहे.
निवडणूक वर्षात दिलासा
दिल्लीत 22 मार्च 2022 रोजी घरगुती (Gas Cylinder Price )एलपीजी सिलिंडरचा दर 949.50 रुपयांवर गेला आणि मे महिन्यात 1000 रुपयांच्या वर गेला. यानंतर 6 जुलै 2022 रोजी सिलिंडर 1053 रुपयांवर पोहोचला. तेव्हापासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत किंमती स्थिर होत्या.
पुढे मार्च महिन्यात किमती पुन्हा वाढल्या. तर, 2024 मध्ये पुन्हा एकदा सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 4 जून रोजी जाहीर होणारे लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा फटका देणारे ठरणार काय?, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
News Title – Gas Cylinder Price
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ; पाच जणांचा मृत्यू
राज ठाकरे धुमाकूळ घालणार? पदवीधर निवडणुकीत मनसेची उडी
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! दहावीचा निकाल थोड्याच वेळात पाहता येणार या वेबसाईटवर
मुंबईकरांनो सावधान! या तारखेपासून पाणी कपात होणार, पाणी जपून वापरा
कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी कारवाई, ससून रुग्णालयातील डॅाक्टरला अटक






