‘बॉलिवूडमध्ये घाण आहे, जी हटवणं गरजेचंय…’; कोरिओग्राफरचं खळबळजनक वक्तव्य

On: April 12, 2025 10:34 AM
Bollywood
---Advertisement---

Bollywood | प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी बॉलिवूडमधील (bollywood) वातावरणावर थेट भाष्य करत एक धक्कादायक विधान केलं आहे. “बॉलिवूडमध्ये काही घाण आहे, जी साफ करणं आता अत्यावश्यक झालं आहे,” असं ते म्हणाले. अल्लू अर्जुनच्या सुपरहिट ‘पुष्पा’ मालिकेसाठी कोरिओग्राफी करणाऱ्या आचार्यांनी बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील अनुभवांमधील फरक स्पष्ट करताना हे वादग्रस्त विधान केलं.

“बॉलिवूड स्टार्सनी कधीच कौतुक केलं नाही” – आचार्य :

गणेश आचार्य हे केवळ बॉलिवूडमध्येच (bollywood) नव्हे तर साऊथ इंडस्ट्रीतील ‘पुष्पा’, ‘KGF’, ‘देवरा’ आणि ‘गेम चेंजर’ यांसारख्या चित्रपटांतही कोरिओग्राफर म्हणून झळकले आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्टमधून आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या.

गणेश आचार्य यांनी सांगितलं की, ‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला (Allu Arjun) डान्स शिकवून परतल्यानंतर पाच दिवसांनी स्वतः अल्लू अर्जुनने फोन करून त्यांचे कौतुक केलं. “मात्र, बॉलिवूडमधील कोणत्याही स्टारने मला कधी फोन केला नाही, की कामाचं कौतुक केलं नाही,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

Bollywood l “साऊथमध्ये सर्व श्रमिकांचं सन्मानानं स्वागत” :

‘पुष्पा’च्या सक्सेस पार्टीबाबत सांगताना ते म्हणाले की, “मला वाटलं पार्टी म्हणजे फक्त खाणं-पिणं आणि नाच-गाणं, पण तिथे सेटवर काम करणाऱ्या कॅमेरामन, लाईटमन यांनाही स्टेजवर बोलावून अवॉर्ड देण्यात आले. अशा गोष्टी बॉलिवूडमध्ये कधीच होत नाहीत. मी कुणालाही दोष देत नाही, पण इथे एक अशी घाण आहे, जी साफ करणं गरजेचं आहे.” (bollywood)

गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांच्या या विधानानंतर इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून सोशल मीडियावर यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

News Title: Ganesh Acharya’s Shocking Statement: “There’s Filth in Bollywood That Needs Cleaning”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now