“धर्म विचारुन खरेदी करा” म्हणणाऱ्या चौघांवर सोलापुरात गुन्हा दाखल

On: April 29, 2025 8:51 PM
solapur
---Advertisement---

Solapur | सोलापूर (Solapur) शहरात विशिष्ट धर्माच्या व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्याचे आणि इतरांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे फलक घेऊन फिरणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल-

काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दोन समाजात तेढ वाढवणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत होत्या. याच दरम्यान, सोलापूर (Solapur) शहरातील नवी पेठ (Navi Peth) परिसरातील एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये काही युवक सायंकाळी हातात फलक घेऊन उभे असलेले दिसत होते.

या फलकांवर, “त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, तुम्ही धर्म विचारून खरेदी करा,” “जात नव्हे धर्म विचारला,” अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी स्वतःहून (Suo Moto) याची दखल घेत कारवाई केली.

चौघांवर गुन्हा, वयाची पडताळणी सुरू-

या प्रकरणी पोलिसांनी एकूण चार तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांची चौकशी पूर्ण झाली असून, उर्वरित दोघांना मंगळवारी पोलीस उपायुक्तांसमोर हजर केले (Solapur) जाणार आहे. या तरुणांच्या वयाची पडताळणी सध्या सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Arvind Mane) यांनी दिली.

पोलिस आयुक्त एम. राजकुमार (M. RajKumar) यांनी सांगितले की, “नवी पेठेतील व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आहे. सार्वजनिक शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. शहर गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी सर्वांनी यंत्रणेला सहकार्य करावे.” या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

News Title – Four Booked for Religious Hoarding Misuse in Solapur

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now