शिरुरमध्ये गोळीबार! ‘तुला जिवंत सोडणार नाही’ म्हणत त्याने पिस्तूल ताणली, काय घडलं?

On: January 21, 2025 2:58 PM
Pune Crime
---Advertisement---

Firing in Shirur l पुणे (Pune) जिल्ह्यातील चाकण (Chakan) गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आता शिरूरमध्ये (Shirur) देखील एका व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चार वर्षांपूर्वी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाकडे अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमके काय घडले? :

या प्रकरणी महेंद्र मोतीलाल बोरा (Mahendra Motilal Bora) (वय ५३, धंदा-किरणा दुकान, रा. सरदार पेठ, शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

शिरूर शहरातील सरदार पेठ (Sardar Peth) येथील स्वीटी प्रोव्हिजन स्टोअर्ससमोरील हलवाई चौक ते मारुती आळी रस्त्यावर फिर्यादी महेंद्र बोरा यांनी आरोपीविरुद्ध चार वर्षांपूर्वी इन्कम टॅक्सकडे अर्ज केल्याचा गैरसमज आरोपीला झाला होता. या गैरसमजातून, आरोपी कृष्णा वैभव जोशी (Krishna Vaibhav Joshi) (रा. सरदार पेठ, शिरूर, जि. पुणे) याने मद्यपान करून फिर्यादीच्या दुकानाजवळ येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Firing in Shirur l झटापटीत गोळीबार :

शिवीगाळ केल्यानंतर आरोपीने स्वतःजवळ असलेले पिस्तूल बाहेर काढले आणि “मी तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत पिस्तूलाचा खटका दाबला. प्रसंगावधान राखत फिर्यादीने आरोपीचा हात बाजूला करून त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीदरम्यान रस्त्यावर गोळी झाडली गेली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबारानंतर आरोपीने फिर्यादीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कृष्णा वैभव जोशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Title : Firing in Shirur

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now