प्रसिद्ध ज्योतिष अनिल थत्तेंची निकालाआधी मोठी भविष्यवाणी, म्हणाले…

On: June 1, 2024 6:15 PM
Lok Sabha Election 2024
---Advertisement---

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि सातवा टप्प्याचे मतदान 1 जून रोजी पार पडलं. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागून आहे. अशात वेगवेगळे अंदाज आणि एक्झिट पोल समोर येताना दिसत आहेत. अशात प्रसिद्ध ज्योतीष आणि राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.

अनिल थत्तेंची मोठी भविष्यवाणी

प्रसिद्ध ज्योतीष आणि राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. महायुतीला 35 ते 40 जागा मिळतील असा माझा 100% विश्वास आहे, असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे.

माझ्या मते मनसे ना जमेत ना खर्चात. मनेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याच दिसलं नाही. माझं बऱ्यापैकी लक्ष होतं. मित्रांशी चर्चा करायचो. स्टेज शो व्यतिरिक्त, राज ठाकरेंच्या सभेव्यतिरिक्त मनसे कार्यकर्ते दिसले नाहीत, असं थत्ते म्हणालेत.

प्रकाश आंबेडकरांची क्रेडिबलिटी कमी झाली- अनिल थत्ते

प्रकाश आंबेडकरांची क्रेडिबलिटी कमी झाली. कधी शिवसेना, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी नको, युती मोडायचीच काँग्रेस आघाडीमध्ये जायचं नाही, हे ठरवलेलं. आपला उपयोग भाजपला कसा होईल हे त्यांनी सिद्ध केलं, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, एक्झिट पोल येण्याआधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देखील पुन्हा एकदा निकालावर भाष्य केले आहे. भाजपाला यावेळी 303 हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

माझ्या विश्लेषणानुसार भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू शकते. पश्चिम आणि उत्तर भारतात जागांच्या आकडेवारीत फार मोठे बदल दिसण्याची शक्यता कमी वाटते. मात्र पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाला चांगला पाठिंबा मिळत असून याठिकाणी त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

काँग्रेस किती जागा जिंकणार?; नाना पटोलेंनी सांगितला आकडा

आयुष्यात यश मिळवायचं असेल तर ‘या’ सवयी आजच सोडा!

अपघातानंतर पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवारांचा मोठा खुलासा

नताशाला 70 टक्के हिस्सा दिल्यावर हार्दिककडे काय उरणार?, एकूण संपत्ती किती?

गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ; मुकेश अंबानींना टाकलं मागे

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now