पुण्याची जागा कोण जिंकणार?, सर्वच्या सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव

On: June 1, 2024 8:24 PM
Exit Poll 2024
---Advertisement---

Exit Poll 2024 | लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला. आता सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागलंय. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली असताना एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

पुण्याची जागा कोण जिंकणार?,

महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी लढत झाली. एक्झिट पोल  पुणे लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. मात्र हा एक्झिट पोल असून अंतिम निकाल हा चार जून रोजी जाहीर होणार आहे.

Exit Poll 2024 | भाजप महाराष्ट्रातील मोठा पक्ष

भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष नंबर दोनचा पक्ष ठरणार आहे.

ठाकरे गटाला महाराष्ट्रात 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 4 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाला 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार?; एक्झिट पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर

अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, एकही जागा जिंकणार नाही!

शिंदेंना धक्का; उद्धव ठाकरेंची शिवसेना ‘इतक्या’ जागा जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रसिद्ध ज्योतिष अनिल थत्तेंची निकालाआधी मोठी भविष्यवाणी, म्हणाले…

अत्यंत आळशी पण तेवढेच बुद्धिमान असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now