गुड न्यूज! इलेक्ट्रिक गाड्या निम्म्या दरात मिळणार? भारतात सुरू होतोय सर्वात मोठा गेमचेंजर प्रकल्प

On: February 21, 2026 2:40 PM
Electric Vehicle Price Drop
---Advertisement---

Electric Vehicle Price Drop | भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती लवकरच मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागे कारण ठरणार आहे भारतीय कंपनी Himadri Speciality Chemicals हिने हाती घेतलेला मोठा प्रकल्प. कंपनी आता ईव्ही बॅटरीसाठी अत्यंत महत्त्वाचे ‘लिथियम आयर्न फॉस्फेट’ (LFP) कॅथोड मटेरियल देशातच तयार करणार आहे. या निर्णयामुळे भारतातील ईव्ही उद्योगात मोठा बदल अपेक्षित आहे.

सध्या LFP कॅथोड मटेरियलसाठी भारतासह अनेक देश चीनवर अवलंबून आहेत. मात्र देशातच उत्पादन सुरू झाल्यास बॅटरीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. परिणामी इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ओडिशात उभारला जाणार भव्य प्रकल्प :

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प Odisha राज्यात उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता तब्बल 2 लाख मेट्रिक टन असेल. प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील पाच वर्षांत 100 गीगावॉट-अवर (GWh) क्षमतेसाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. (Electric Vehicle Price Drop)

हा प्रकल्प चीनबाहेरील अशा प्रकारचा जगातील पहिला मोठा उपक्रम ठरू शकतो. त्यामुळे जागतिक ईव्ही आणि बॅटरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय उत्पादकांशी चर्चाही सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

Electric Vehicle Price Drop | LFP बॅटरीमुळे किमतीत घट, सुरक्षिततेत वाढ :

जगभरातील ईव्ही कंपन्या सध्या LFP बॅटर्‍यांकडे वळत आहेत. पारंपरिक लिथियम-आयन बॅटर्‍यांच्या तुलनेत LFP बॅटरी अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि किफायतशीर मानल्या जातात. या बॅटर्‍या उष्णतेला अधिक सहनशील असून आग लागण्याचा धोका कमी असतो. तसेच त्यांचे आयुष्य साधारण 10 वर्षांपर्यंत असू शकते.

याशिवाय LFP बॅटर्‍यांमध्ये कोबाल्ट किंवा निकेलचा वापर नसल्याने त्या पर्यावरणपूरक मानल्या जातात. स्थानिक उत्पादनामुळे कच्चा माल सहज उपलब्ध होईल आणि आयात खर्च कमी होईल. परिणामी इलेक्ट्रिक वाहनांची किंमत निम्म्यापर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे भारताची स्वदेशी उत्पादन क्षमता वाढेल आणि ईव्ही क्षेत्रात देशाला जागतिक स्तरावर नवे स्थान मिळू शकते.

News Title : EV Prices Likely to Drop in India as Himadri Plans LFP Battery Material Plant in Odisha

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now