EPFO New Rules | कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय बचत पर्याय मानला जातो. मात्र, गरजेच्या वेळी किती रक्कम काढता येते, कोणत्या परिस्थितीत 75% किंवा 100% निधी मिळतो आणि त्यासाठी कोणत्या अटी आहेत या सर्व बाबींमध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. ईपीएफओने आता नियम आणखी स्पष्ट आणि सोपे करत नवीन गाइडलाइन जाहीर केली आहे. या नियमांमुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद, पारदर्शक आणि सोपी झाली आहे.
अत्यावश्यक खर्च, आरोग्य उपचार, घर खरेदी, दुरुस्ती, शिक्षण किंवा बेरोजगारीसारख्या परिस्थितीत पीएफ काढण्याची सुविधा मोठा आर्थिक आधार देते. याच पार्श्वभूमीवर ईपीएफओने 13 महिन्यांचा वेटिंग पीरियड कमी करून फक्त 3 महिने केला आहे. तसेच पूर्वी 5 ते 7 वर्षांची सेवा अनिवार्य असताना, आता 12 महिन्यांचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पैसे काढता येऊ शकतात. (EPFO New Rules)
नवे नियम समजून घ्या :
घर खरेदी किंवा दुरुस्ती करण्यासाठी PF मधील मूळ रकमेच्या 90% पर्यंत पैसे काढण्याची परवानगी आता उपलब्ध आहे. म्हणजेच खात्यात जर 1 लाख रुपये असतील, तर थेट 90,000 रुपये काढता येऊ शकतात. घराशी संबंधित खर्चाची तातडीची गरज भासणाऱ्यांसाठी हा नियम मोठा दिलासा आहे.
कुटुंबात आजारपणाचे प्रसंग उद्भवल्यास ईपीएफओ 100% रक्कम काढण्याची मुभा देतो. वैद्यकीय उपचारांसाठी निधी तत्काळ उपलब्ध होणे कर्मचाऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत ठरते. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी किंवा भावंडांच्या विवाहासाठी PI account मधील 75% पर्यंत रक्कम काढता येते. यात कर्मचारी योगदान तसेच मिळालेले व्याज या दोन्ही रकमेचा समावेश होतो.
नियमांमधील या बदलांमुळे घरगुती गरजा, शिक्षणाचा खर्च आणि आरोग्य उपचारांसाठी निधी कमी पडणार नाही, याची मोठी खात्री निर्माण होते.
EPFO New Rules | बेरोजगारी किंवा नोकरी बदलल्यावर पैसे कसे काढता येतात? :
कर्मचारी त्यांच्या सध्याच्या नोकरीत 12 महिने पूर्ण केल्यास पीएफ अकाउंटमधील 75% रक्कम काढू शकतात. उदाहरणार्थ, जर खात्यात 1 लाख रुपये असतील, तर जवळपास 75,000 रुपये तात्काळ उपलब्ध होतात. हा नियम नोकरी बदलणाऱ्या किंवा जीवनातील एखाद्या टप्प्यावर अतिरिक्त पैशांची गरज भासणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
नोकरी सोडल्यास किंवा नोकरी गमावल्यास दोन महिन्यांच्या बेरोजगारीनंतर 100% रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. नवीन गाइडलाइननुसार बेरोजगारीचा कालावधी किंवा सेवाकाळ यांवर अवलंबून संपूर्ण पीएफ काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी करण्यात आली आहे. यामुळे अचानक आलेल्या आर्थिक संकटातही बचत निधी उपलब्ध राहतो.
संपूर्ण PF बॅलन्स एकाचवेळी काढू शकतात :
रिटायरमेंटनंतर कर्मचारी त्यांचा संपूर्ण PF बॅलन्स एकाचवेळी काढू शकतात. ईपीएफओने पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि जलद केली असून, आता मोठा विलंब न होता कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचा लाभ मिळतो. ईपीएफओचा उद्देश म्हणजे आरोग्य खर्च, गृहप्रकल्प किंवा आर्थिक अडचणींमध्ये कर्मचाऱ्यांना वेळीच मदत उपलब्ध करून देणे हा आहे.
नियमांमधील या सुधारणा लक्षात घेतल्यास पीएफवरील अवलंबित्व वाढणार असून, गरजेच्या वेळी तातडीने पैसे उपलब्ध होण्याचा विश्वास कर्मचाऱ्यांना मिळत आहे.






