मनोरंजन सृष्टीत शोककळा! ‘या’ २५ वर्षीय अभिनेत्रीची निर्घृण हत्या, बॉयफ्रेंडलाही अटक

On: December 25, 2025 5:57 PM
Imani Smith Death
---Advertisement---

Imani Smith Death | मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 25 व्या वर्षी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ज्या व्यक्तीवर तिने विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत तिने आयुष्याची स्वप्नं पाहिली, त्याच व्यक्तीने तिचा जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे केवळ मनोरंजन क्षेत्रच नाही तर सामान्य नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे.

21 डिसेंबर 2025 रोजी ही भीषण घटना घडली असून अभिनेत्रीचा मृत्यू चाकूने वार करून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अभिनेत्री न्यू जर्सी येथे वास्तव्यास होती. तिच्या घरातच तिच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आयुष्य संपुष्टात आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यू जर्सीमध्ये थरारक घटना; अनेक चाकूचे वार :

न्यू जर्सीच्या काउंटी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी सकाळी 9.18 वाजता या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस तातडीने अभिनेत्रीच्या एवेन्यू येथील घरी पोहोचले. घटनास्थळी अभिनेत्री रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्या शरीरावर अनेक चाकूचे वार असल्याचं स्पष्ट दिसून आलं. (New Jersey murder case)

पोलिसांनी तिला तात्काळ रॉबर्ट वुड जॉनसन युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं. ही घटना इतकी क्रूर होती की तपास अधिकाऱ्यांनाही हादरून टाकणारी ठरली. प्राथमिक तपासात ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध आणि निर्घृण पद्धतीने केल्याचे संकेत मिळत आहेत.

मृत अभिनेत्रीचं नाव इमानी डिया स्मिथ (Imani Smith Death) असं असून ती हॉलिवूडमधील एक उभरती अभिनेत्री होती. ‘द लायन किंग’ आणि ‘ब्रॉडवे’सारख्या नामांकित प्रोजेक्ट्समध्ये तिने काम केलं होतं. कमी वयातच तिने मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती.

Imani Smith Death | बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप; फर्स्ट डिग्री मर्डरचा गुन्हा दाखल :

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इमानी स्मिथचा 35 वर्षीय बॉयफ्रेंड जॉर्डन डी. जॅक्सन स्मॉल याच्यावरच हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि जवळच्या नात्यात होते, अशी माहिती समोर आली आहे.

एडिसन पोलिसांनी जॉर्डनला अटक केली असून त्याच्यावर फर्स्ट डिग्री मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सेकंड डिग्रीमध्ये मुलांची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप आणि थर्ड डिग्रीमध्ये अवैधरित्या हत्यार बाळगल्याचे आरोपही त्याच्यावर लावण्यात आले आहेत. या घटनेच्या वेळी अभिनेत्रीचा तीन वर्षांचा मुलगा घरात असल्याची माहिती समोर येत असल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील ठरत आहे. (Imani Smith Death)

इमानी स्मिथच्या मृत्यूनंतर तिचा तीन वर्षांचा मुलगा, आई-वडील, काकी तसेच दोन लहान भाऊ-बहिण असा मोठा परिवार पोरका झाला आहे. तिच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना घरगुती हिंसाचार आणि विश्वासघाताच्या गंभीर परिणामांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली आहे.

News Title: Entertainment World Shocked: 25-Year-Old Actress Brutally Murdered, Boyfriend Arrested

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now