राजकीय ठिणगी! नाईकांच्या टीकेला शिंदेंचं सडेतोड उत्तर; ‘या’ एका विधानाने चर्चांना पूर्णविराम

On: February 16, 2026 5:18 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | नवी मुंबईतील भूखंडांच्या मुद्द्यावरून मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या आरोपांवर आता एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देत अत्यंत थोडक्यात उत्तर दिले असून त्यांनी एका वाक्यात संपूर्ण विषयावर भूमिका स्पष्ट केली आहे.

भूखंड प्रकरणावरून तीव्र आरोप-प्रत्यारोप :

दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील भूखंडांच्या वाटपाबाबत बोलताना गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. बिल्डरांना दलालांच्या माध्यमातून भूखंड दिल्याचा आरोप त्यांनी केला. आपण ज्या मंत्रिमंडळात कार्यरत आहोत, त्याच सरकारमधील नगरविकास खात्याशी संबंधित व्यक्तींनी जनतेच्या हिताला बाधा आणणारी कृती केली, असे ते म्हणाले. या प्रकरणामुळे आपल्याला लाज वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सिडको (CIDCO) आणि एमआयडीसी (MIDC) यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेला विकासासाठी देण्यात येणारे भूखंड तात्काळ हस्तांतरित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. जनतेच्या विकासासाठी आपण आमदार आणि मंत्री झालो; जर विकासाच्या कामांसाठी आवश्यक जमीनच मिळाली नाही तर अशा पदाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले.

Eknath Shinde | शिंदे गटाचे प्रत्युत्तर आणि एकनाथ शिंदेंची भूमिका :

गणेश नाईक यांच्या विधानांनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) तसेच आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या विषयावर प्रतिक्रिया देताना “गणेश नाईकांना काल श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं आहे,” असे एका वाक्यात सांगून अधिक भाष्य टाळले.

डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी यापूर्वी प्रतिक्रिया देताना गणेश नाईक यांच्यावर आसुयेचा आरोप केला होता. शिंदे साहेब शाखाप्रमुख असताना नाईक मंत्री होते, त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले तरी नाईक त्याच ठिकाणी आहेत, असे ते म्हणाले. २०२२ मधील उठाव नसता तर त्यांना मंत्रिपदही मिळाले नसते, असा दावा त्यांनी केला. शिंदे टीकेला शब्दांनी नाही तर कामातून उत्तर देतात, असे सांगत त्यांनी नाईकांना इशाराही दिला होता.

News title : Eknath Shinde Responds to Naik Allegations

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now