कुणाल कामराच्या ‘त्या’ वादग्रस्त गाण्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर!

On: March 26, 2025 12:36 PM
Eknath Shinde reaction on Kunal Kamra controversy
---Advertisement---

Kunal Kamra Controversy | कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra Controversy) याने सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. शिवसेना फुटीवर आधारित या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नाव न घेता टीका करण्यात आली होती.  आता खुद्द शिंदेंनी या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदेंचा आरोप : कामराने सुपारी घेऊन केलेली बदनामी

कुणाल कामरा याचे गाणे केवळ व्यंग नाही, तर तो एक प्रकारचा स्वैराचार आणि वैयक्तिक बदनामी करणारा प्रयत्न आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “ही तर कुणाची तरी सुपारी घेऊन केलेली बदनामी आहे.” त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांवर आपण कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

शिंदे पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून अनेक आरोप होत आले, पण आपण कधीही आरोपाला आरोपाने उत्तर दिले नाही. आपण कामातूनच उत्तर दिलं आणि जनतेने त्यावर विश्वास ठेवत निवडणुकीत 80 पैकी 60 जागा आपल्याला दिल्या. याचाच अर्थ लोकांनी खरे समर्थन कुणाला दिले, हे स्पष्ट होते.

“हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही,तर…”

अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं, यावर आमचा विश्वास आहे, असं स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, “विडंबन आम्ही समजू शकतो, पण हे जे काही सादर केलं गेलं, ते विडंबन नसून अश्लीलपणाचं प्रदर्शन आहे.” त्यांच्या मते, कामराने केवळ शिंदे नव्हे तर सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही वारंवार टीका केली असून, ती टीका अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीबाहेरची आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, “मी हॉटेल तोडफोडीस समर्थन देत नाही, पण ती कार्यकर्त्यांची भावना होती.” यासोबतच त्यांनी स्पष्ट केलं की, अशा गोष्टींना खूप महत्त्व देण्याची गरज नाही, कारण त्यामागे हेतूपुरस्सर केलेली बदनामी आहे.

Title : Eknath Shinde reaction on Kunal Kamra controversy

 

Join WhatsApp Group

Join Now