Eknath shinde | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही केली जाऊ शकते. त्यामुळे आज (14 ऑक्टोबर) झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महायुती सरकारने अनेक निर्णयांचा सपाटा लावला. गेल्या महिनाभरात 165 च्या आसपास निर्णय घेण्यात आले आहेत. आज नुकत्याच झालेल्या बैठकीत देखील काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी टोलमाफीचा एक निर्णय घेण्यात आला. (Eknath shinde)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही.
मुंबईत लहान मोटर वाहनांना टोलमाफी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही. आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
या वर्षाच्या सुरुवातीला, या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल 45 रुपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. शहरातील उड्डाणपुलांच्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता. मात्र, आता या पाच नाक्यावर टोलमाफी करण्यात आली आहे. (Eknath shinde )
निवडणूक लक्षात घेता महायुती सरकारकडून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. महिनाभरात शासनाच्या वतीने विविध हजारच्या आसपास शासकीय आदेश (जी.आर.) काढण्यात आले. आजही मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून आजही बैठकीत विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.
‘या’ 5 टोलनाक्यांवर असणार टोलमाफी
ऐरोली
वाशी
दहिसर
मुलुंड-एलबीएस
आनंदनगर (Eknath shinde)






