Chhava | सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची भूमिका असलेला ‘छावा’ (Chhava) चित्रपट चांगली कमाई करत आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला, तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
चित्रपटाच्या टीमने (Team) जोरदार प्रमोशन (Promotion) केले. अजूनही विकी कौशल (Vicky Kaushal) चित्रपटाबाबत मुलाखती देत आहे. चित्रपटाचे सकाळी 6 पासूनचे शो (Shows) देखील हाऊसफुल (Housefull) आहेत, तसेच रात्री उशिरापर्यंतचे शो पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.
प्रेक्षक चित्रपट पाहतानाचे किंवा त्यांना आवडलेल्या भागांचे व्हिडिओ (Video) शेअर करत आहेत. अशातच, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे, ज्यामध्ये ‘छावा’ (Chhava) चित्रपट पाहताना एका प्रेक्षकाने चक्क सिनेमाचा पडदा फाडल्याची घटना घडली आहे. ही घटना गुजरातमधील (Gujarat) भरूचमध्ये (Bharuch) घडली. रात्री 11.45 च्या शोदरम्यान हा प्रकार घडला. चित्रपटाचा महत्त्वाचा क्लायमॅक्स (Climax) सुरू असतानाच ही घटना घडली. चित्रपटाच्या पडद्यावर औरंगजेब (Aurangzeb) शंभूराजांना (Shambhu Raje) कैद करून त्यांचा छळ करत असल्याचा सीन सुरू होता. तेव्हा एक प्रेक्षक उठला आणि त्याने रागात सिनेमाचा पडदा फाडला. त्यामुळे थिएटरमधील (Theater) पडद्याचे नुकसान झाले.
पोलिसांत तक्रार
नुकसान होताच थिएटर मालकाने (Theater Owner) पोलिसांना (Police) याबाबत कळवले. कर्मचाऱ्यांनी त्या प्रेक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी प्रेक्षक शुद्धीत नव्हता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रेक्षकांनी दिली. पडदा फाटल्यामुळे काही प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रीनवर (Screen) चित्रपट दाखवण्यात आला, तर काहींना त्यांचे पैसे परत करण्यात आले.
‘छावा’ (Chhava) चित्रपटाची कमाई
‘छावा’ (Chhava) चित्रपटाने 4 दिवसांत 140 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर जगभरात चित्रपटाची कमाई 160 कोटींच्या वर पोहोचली आहे. या चित्रपटात विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारली आहे, तर रश्मिकाने (Rashmika) महाराणी येसूबाईंची (Maharani Yesubai) भूमिका साकारली आहे. अभिनेता अक्षय खन्नाने (Akshay Khanna) औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे.
Title : During the ‘Chhava’ movie screening audience broke the cinema screen






