“…तर मी जीवन संपवेल,” मृत डॉक्टरच्या घरच्यांकडून मोठा गौप्यस्फोट

On: October 24, 2025 4:16 PM
Dr Sampada Munde
---Advertisement---

Dr Sampada Munde | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण मधील घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांनी हॉस्टेल मध्ये आत्महत्त्या केली. या डॉक्टरचा मृतदेह हॉस्टेलमध्ये आढळला असून, हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातावर त्यांनी सुसाईड नोट लिहिली. यात त्यांनीही PSI गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलिस प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

डॉक्टरच्या काकांनी केला गंभीर आरोप

डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांचे काका यांनी मीडियाशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “ती अनेक दिवसांपासून तणावात होती. तिला पोस्टमार्टम करताना अहवाल बदलून देण्यासाठी दबाव आणला जात होता. तिने या त्रासाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणजेच DYSP यांच्याकडे तक्रार केली होती, पण तिला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ती म्हणत होती, ‘मी आयुष्य संपवणार’.”

डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांचे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्यासोबत वाद चालू होते. त्यांच्यावर पोस्टमार्टम झाल्यानंतर रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात होता. पोलिसांशी झालेल्या वादामुळे त्यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. याबाबत त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत, “माझ्यावर अन्याय होत आहे; मी आत्महत्या करीन,” असा इशाराही दिला होता.

प्रकरणाची चौकशी सुरु

या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे. मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वतः प्रकरणात लक्ष घातले असून आरोप करण्यात आलेले PSI गोपाल बदने आणि पोलिस प्रशांत बनकर याना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात पोलिस अधीक्षकांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितलं असल्याचे म्हणाले. कोणालाही या प्रकरणात सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

News Title:-  Dr Sampada Munde uncle made a shocking revelation

Join WhatsApp Group

Join Now