ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

On: January 21, 2025 10:14 AM
Dr Kisan Maharaj Sakhare Scholar of Sant Sahitya Passes Away
---Advertisement---

Dr Kisan Maharaj Sakhare | संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा (Warkari Sampraday) वारसा पुढे नेणारे ज्येष्ठ कीर्तनकार (Kirtankar) डॉ. किसन महाराज साखरे (Dr Kisan Maharaj Sakhare) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा पुण्यातील (Pune) चिंचवड (Chinchwad) येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने डॉ. किसन महाराज साखरे (Dr. Kisan Maharaj Sakhare) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

डॉ. किसन महाराज साखरे यांचा परिचय

डॉ. किसन महाराज साखरे यांच्या पश्चात कन्या यमुना कंकाळ, पुत्र यशोधन साखरे (Yashodhan Sakhare) आणि चिदंबरेश्वर साखरे असा परिवार आहे. आळंदी (Alandi) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Dr Kisan Maharaj Sakhare)

साखरे महाराज यांनी आळंदी (Alandi) येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे (Dnyaneshwar Maharaj Sansthan) विश्वस्त म्हणून काम पाहिले होते. तसेच, आळंदी (Alandi), देहू (Dehu) परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते. याशिवाय, ग्रंथराज ज्ञानेश्वरीची (Dnyaneshwari) दृकश्राव्य प्रत (Audio-Visual Copy) त्यांनी प्रकाशित केली होती.

वारकरी संप्रदायाची (Warkari Sampraday) मोठी हानी

डॉ. किसन महाराज साखरे (Dr Kisan Maharaj Sakhare) यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची (Warkari Sampraday) मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने संत साहित्याचा (Sant Sahitya) एक गाढा अभ्यासक हरपला आहे.

Title : Dr Kisan Maharaj Sakhare Scholar of Sant Sahitya Passes Away

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now