Donald Trump Health Update | डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक मंचानंतर समोर आलेल्या फोटोमध्ये त्यांच्या डाव्या हातावर निळसर जखम दिसून आल्याने चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता व्हाईट हाऊसकडून यावर स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.
व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरण :
ट्रम्प यांनी स्वतः सांगितले की, त्यांचा हात टेबलच्या कोपऱ्यावर आदळल्यामुळे ही जखम झाली आहे. ही किरकोळ दुखापत असून कोणतीही गंभीर समस्या नाही. त्यांनी हेही स्पष्ट केलं की ते नियमित अॅस्पिरिन घेत असल्यामुळे अशा प्रकारच्या जखमा लवकर दिसतात, पण आरोग्याबाबत चिंता करण्यासारखं काहीही नाही. (Donald Trump Health Update)
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी निवेदनात सांगितलं की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाताला टेबलच्या कडेमुळे किरकोळ जखम झाली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि कामकाजात कोणताही अडथळा नाही.”
Donald Trump Health Update | आजार किती गंभीर? :
सध्या उपलब्ध माहितीनुसार ट्रम्प यांना कोणताही गंभीर आजार नाही. ही केवळ सामान्य जखम असून त्यांची तब्येत पूर्णपणे ठीक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






