Dombivli MIDC Blast | डोंबिवली येथील एमआडीसीमध्ये (Dombivli MIDC Blast) अग्नितांडव झाल्याची घटना घडली आहे. यामुळे डोंबिवली एमआयडीसीच्या (Dombivli MIDC Blast) आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवीत हानी झाल्याची माहिती समोर आली नव्हती. मात्र आता त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
50 हून अधिक घरांचं नुकसान
हा ब्लास्ट इतका खतरनाक होता की यामुळे एमआयडीसीच्या आजूबाजूला धुराचे साम्राज्य पसरले होते. यामुळे एमआयडीसीच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. डोंबिवली बॉम्ब ब्लास्टचा (Dombivli MIDC Blast) आवाज हा दोन किमीपर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान एमआयडीसीच्या आजूबाजूला 50 हून अधिक घरं आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Dombivli MIDC Blast)
सोनार पाडा गावाला मोठा हादरा बसला आहे. घरं, इमारती आणि दुकानांच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच फर्निचरचे देखील मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातले नागरिक तातडीने घराबाहेर पडले आहेत. परिसरात काचांचा सडा पडल्याचं पाहायला मिळत आहे.
नागरिक संतापले
कंपनीजवळ राहणाऱ्या घरांचे पत्रे आणि काचा फुटल्याचं पाहायला मिळतंय. घरातील सामान पूर्णपणे तुटले आहे. आसपासच्या परिसरात करोडो रूपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही आमच्या लहान मुलांना किती दिवस असंच जीव मुठीत धरून ठेवायचं?, असा प्रश्न राहिवाशांनी केला आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. आगीची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
News Title – Dombivli MIDC Blast News Update
महत्त्वाच्या बातम्या
डोंबिवली एमआयडीसीत बॉयलरचा स्फोट, तीन-चार किमीपर्यंत हादरे
IPL मधील अपयशानंतर हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?; लवकरच घेणार घटस्फोट?
पुणे अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट; आता आजोबांचीही चौकशी होणार
“स्वयंघोषित गांधी अण्णा हजारे 2014 नंतर गायबच झाले”
‘गाडी देऊन चूक केली’; मुलाने दोघांचा जीव घेतल्यानंतर विशाल अग्रवालला खंत






