Dindori Loksabha l आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कारण आज संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे देशासह राज्यात कोणाची सत्ता येणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे.
भगरेंची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता :
अशातच आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात मुख्य लढत होत आहे. मात्र अशातच आता दिंडोरी मतदारसंघात एक ट्विस्ट आला आहे. दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेल्या उमेदवाराला तब्बल 12 हजार मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भास्कर भगरेंची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी चौथ्या फेरीत अखेर 6 हजार 989 मतांनी आघाडी घेतली आहे. मात्र दुसऱ्या दसऱ्या उमेदवाराच्या आडनावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे सरांना चक्क 12389 मते मिळाली आहेत.
Dindori Loksabha l निकलाअंती महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना फायदा होण्याची शक्यता :
दिंडोरी लोकसभा मतदार संघात एकच आडनाव आसलेल्या उमेदवारामुळे नाट्यमय वळण मिळण्याची दात शक्यता आहे. तसेच या निकलाअंती महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना फायदा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यावर निकालाआधीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
News Title- Dindori Loksabha Result Updates
महत्वाच्या बातम्या-
राज्यातला पहिला जल्लोष, निकालाआधीच अमोल कोल्हेंकडून अशाप्रकारे आनंद साजरा
मावळमध्ये कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
वसंत मोरेंना पुणेकरांनी नाकारलं; फॉलोवर्स एवढेही मतं पडली नाहीत
ओमराजे निंबाळकरांचं डोंगराएवढं लीड… अर्चना पाटील यांचा पराभव अटळ?
जालन्यात रावसाहेब दानवेंचं टेंशन वाढलं! कॉँग्रेस उमेदवाराची जोरदार आघाडी






