अंकिताने अभिजीत आणि निक्कीला लग्नाला बोलावलं की नाही?, निक्कीने खरं खरं सांगून टाकलं

On: February 26, 2025 1:55 PM
Did Ankita Walawalkar Invite Abhijeet and Nikki to Her Wedding 
---Advertisement---

 Ankita Walawalkar | ‘कोकण हार्टेड’ फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 16 फेब्रुवारी रोजी संगीतकार कुणाल भगत (Kunal Bhagat) सोबत तिने लग्नगाठ बांधली. तिच्या मेहंदीपासून ते हळदी, लग्न, रिसेप्शनपर्यंतचे सगळे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या शाही लग्नसोहळ्याला अनेक कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मात्र, काही चेहरे या सोहळ्यात दिसले नाहीत आणि त्यामुळेच चाहत्यांमध्ये चर्चा रंगली.

‘बिग बॉस मराठी’च्या काही स्पर्धकांना निमंत्रण दिलं नव्हतं?

अंकिता आणि कुणालच्या लग्नाला मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र, ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वातील काही स्पर्धक अनुपस्थित होते. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant), निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अरबाज पटेल (Arbaaz Patel), जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) आणि घनःश्याम दरवडे (Ghanashyam Darwade) हे लग्नात दिसले नाहीत. त्यामुळे अंकिताने त्यांना निमंत्रण दिलं की नाही, हा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

निक्की तांबोळीला याबाबत विचारलं असता तिने खुलासा केला. ती म्हणाली, “तिने मला सुरुवातीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण मी कामात इतकी व्यग्र होते की मला जमलंच नाही. पण, तिला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.” निक्कीच्या उत्तरावरून तरी अंकिताने तिला लग्नाचं निमंत्रण दिलं होतं, हे स्पष्ट होतं. मात्र, अभिजीतला बोलावलं होतं का, यावर निक्कीने भाष्य केलं नाही.

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’बद्दल निक्कीचं मत

‘बिग बॉस मराठी’नंतर निक्की तांबोळी सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ (Celebrity MasterChef) या कार्यक्रमात दिसत आहे. तिथे ती वेगवेगळे पदार्थ तयार करून परीक्षकांची मनं जिंकत आहे. मुलाखतीत तिला तिच्या आवडी-निवडीबद्दल विचारण्यात आला.

निक्कीला तिचा आवडता पदार्थ कोणता, असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “सध्या मी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये आहे, त्यामुळे बरेच पदार्थ आवडते झाले आहेत. पण करंजी मला विशेष आवडते.” तिने रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा आपला आवडता अभिनेता असल्याचं सांगितलं, तर ‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) हा तिचा अत्यंत प्रिय चित्रपट असल्याचंही तिने स्पष्ट केलं. शिवाय, स्वयंपाक करणे हा तिचा आवडता छंद असल्याचं ती म्हणाली.

अंकिताच्या लग्नाला कोण-कोण होतं उपस्थित?

अंकिताच्या लग्नाला ‘बिग बॉस मराठी’च्या काही स्पर्धकांची अनुपस्थिती जाणवली. मात्र, धनंजय पोवार (Dhananjay Powar), पंढरीनाथ कांबळे (Pandharinath Kamble), पुरुषोत्तम दादा पाटील (Purushottam Dada Patil) आणि निखिल दामले (Nikhil Damle) यांनी या सोहळ्यात हजेरी लावली. त्यामुळे अंकिताचा ‘बिग बॉस’ ग्रुप अजूनही तिच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं. ( Ankita Walawalkar)

Title : Did Ankita Walawalkar Invite Abhijeet and Nikki to Her Wedding 

 

Join WhatsApp Group

Join Now