‘मन अत्यंत व्यथित…’; राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलंच ट्वीट चर्चेत

On: March 4, 2025 12:19 PM
Dhananjay Munde first tweet after resignation
---Advertisement---

Dhananjay Munde | दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धक्कादायक फोटो आणि काही व्हिडिओ काल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. यामध्ये सर्व आरोपींचे चेहरे स्पष्टपणे दिसून आले. यानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी प्रचंड जोर धरत होती. अखेर आज (4 मार्च) धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

CID च्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हा या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजून तीव्र झाली. त्यातच हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली. अखेर आज मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला.

यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक ट्वीट करत राजीनाम्यामागील कारण देखील स्पष्ट केलं आहे.

धनंजय मुंडे यांचं ट्वीट-

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. (Dhananjay Munde)

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Title : Dhananjay Munde first tweet after resignation

Join WhatsApp Group

Join Now