“देवेंद्र फडणवीस छोटा राजन आणि नरेंद्र मोदी…”; संजय राऊतांची जहरी टीका

Sanay Raut | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने मोठा दिलासा दिला आहे. ED ने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते. गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही मालमत्ता पटेल यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

मात्र, आता पटेल यांची ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचे ईडीने म्हणत त्यावरील जप्ती रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. एनडीए सरकार, ईडी कारवाई या सर्व बाबीवर बोलताना राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

देशात फक्त राजकीय विरोधकांच्याच मालमत्तांच्या मागे ईडी लावली जाते आहे. जो न्याय प्रफुल्ल पटेलांना लावला तोच सगळ्यांना लावला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली.तसंच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट छोटा राजन म्हटलं.

“नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार”

देवेंद्र फडणवीस यांनी कॉँग्रेसवर टीका केली होती. कॉँग्रेसने खोटे आश्वासन देऊन महाराष्ट्रात निवडणूक जिंकली, असं फडणवीस म्हणाले होते. यावरच संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला.

“काँग्रेसने खोटं काहीही सांगितलं नाही. खोटं बोलणारे नरेंद्र मोदी आहेत. खोट्यांचे सरदार मोदी आहेत. देवेंद्र फडणवीस छोटे सरदार आहेत. एक बडा राजन आणि दुसरा छोटा राजन. खोटं बोलण्यास सुरुवात कुणी केली तर मोदी आणि शाह यांनी केली. त्यामुळे त्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवायला जाऊ नये.”, असं संजय राऊत (Sanay Raut ) म्हणाले आहेत.

“शिंदे गटाचे खासदार चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आले”

यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला. “शिंदे गटाचे खासदार चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांना परदेशात चार हाय कमिश्नरची पदंही देणार आहेत. त्यांनी मागितलेत असं कळलंय. अजून काय काय मागणार आहेत माहीत नाही. चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आलेत. चोरलेला पक्ष, चोरलेले विजय अमोल किर्तीकरांसारखे. त्यामुळे काही दिवसांनी हाय कमिश्नर म्हणून निवडलेले दिसतील.”, असा टोलाही संजय राऊत (Sanay Raut ) यांनी लगावला.

News Title –  Devendra Fadnavis Is Like Chota Rajan Said Sanay Raut

महत्त्वाच्या बातम्या-

निकालानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर; शिवसेना नेत्याचा भाजप नेत्याला गंभीर इशारा

…तर तिने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला; संजय राऊतांनी कोणाला सहानुभूती दिली?

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांना गावकऱ्यांनी दिला सर्वात मोठा धक्का

भाजपने असं काय केलं? थेट मनसेने घेतली माघार

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी