मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

Devendra Fadanvis | राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. यामुळे भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डेकेदुखीत वाढ झाल्याचं दिसून आलं. याचपार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्रीपद देणार?

निकालानंतर फडणवीसांनी मला मोकळं करा, अशी विनंती भाजप वरिष्ठांना केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाचा ते स्वत: राजीनामा देतील, असं बोललं जात असताना भाजप नेते गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्रीपद देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

गिरीश महाजन यांना भाजपचे संकट मोचन म्हणून संबोधलं जातं. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर जनमानसात वावरणारे नेते म्हणून गिरीश महाजन यांची ख्याती आहे. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

“उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं”

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं, अशी मागणी केली आहे. याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. काल फडणवीस यांची दिल्ली दौऱ्यावर बैठक झाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात भाजप अॅक्शन मोडवर आलीये. भाजप विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा जनादेश यात्रा काढणार आहे. याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहेत. फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना, कामाची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातील विभागांमध्ये भाजप जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकाल हा नुकताच 4 जून रोजी लागला. महाविकास आघाडीने राज्यात 30 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर महायुतीने राज्यामध्ये केवळ 17 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे हा पराभव भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या जिव्हारी लागला. यामुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

News Title – Devendra Fadanvis DCM Of Maharashtra Resign Latest News

महत्त्वाच्या बातम्या

“राम मंदिर तर बांधलं पण, शहरवासीयांचं जीवन..”; BJP च्या अयोध्येतील पराभवानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट

पुढील 48 तासांत ‘या’ भागांना अवकाळी झोडपणार; हायअलर्ट जारी

‘मोदींनी गेले तीन महिने आराम केला नाही, त्यामुळेच…’; चंद्राबाबूंचं मोठं वक्तव्य

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?