Global Warming l ‘ला निना’चा (La Nina) प्रभाव असूनही, जानेवारी महिन्यात 1940 नंतरचे सर्वाधिक विक्रमी तापमान (Record Temperature) नोंदविले गेले. युरोपियन हवामान संस्थेने (European Climate Organization) गुरुवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, ‘ला निना’मुळे जागतिक तापमान कमी होते.
2024 ठरले पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष:
2024 हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले आहे. अशातच 2025 मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जागतिक सरासरी तापमान (Global Average Temperature) औद्योगिकीकरणापूर्वीच्या (Pre-industrialization) पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसने वाढले आहे.
‘ला निना’चा प्रभाव काय?:
‘ला निना’ ही एक हवामान पद्धत आहे, जिथे मध्य प्रशांत महासागरातील (Central Pacific Ocean) पृष्ठभागावरील पाणी नेहमीपेक्षा थंड होते, ज्यामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो. ‘ला निना’च्या प्रभावामुळे भारतात जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो आणि त्याचबरोबर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दुष्काळी स्थिती निर्माण होते. यामुळे जागतिक तापमान थोडे थंड होते किंवा तापमान कमी होते. तर या उलट, ‘एल निनो’ (El Nino) ची घटना हवामान गरम करते, असे संशोधकांनी सांगितले.
Global Warming l ‘सी3एस’नुसार (C3S):
-कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (Copernicus Climate Change Service – C3S) नुसार, जानेवारी 2025 मध्ये सरासरी 13.23 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे मागील सर्वात उष्ण जानेवारी (2024) पेक्षा 0.09 अंश जास्त आणि 1991-2020 च्या सरासरीपेक्षा 0.79 अंश जास्त होते.
– गेल्या 12 महिन्यांचा कालावधी (फेब्रुवारी 2024 – जानेवारी 2025) औद्योगिकीकरणापूर्वीच्या काळापेक्षा 1.61 अंश सेल्सिअस जास्त उष्ण होता.
– जानेवारीत समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 20.78 अंश सेल्सियस होते.
शास्त्रज्ञांचे मत:
शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की, जानेवारीमध्ये पृथ्वीचे तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा 1.75 अंश सेल्सिअस जास्त होते. गेल्या 19 महिन्यांपैकी 18 महिन्यांत जागतिक तापमान 1.5 अंशांपेक्षा जास्त राहिले.






