Crime News | गुजरात येथील बडोदा येथून मोठी अपडेट समोर आली आहे. एका अल्पवयीन मित्राने आपल्याच मित्राला चाकूने भोकसलं आहे. कारण ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गर्लफ्रेंड नसल्यावरून मित्राने आपल्याच मित्राला चेष्टा करण्याच्या उद्देशाने चिडवलं. मात्र त्या मित्राला अल्पवयीन मित्रानं चाकूनं हल्ला करत संपवलं आहे. (Crime News)
गर्लफ्रेंड नसल्याचं मित्राने चिडवलं आणि त्याचाच त्याला राग आला. त्याच रागातून मित्राला संपवलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मित्राला संपवण्याआधी त्याने काही साथीदारांना सोबत घेतलं आणि मित्राला भेटायला बोलावलं. त्यावेळी आपल्या साथीदारांसोबत त्याला संपवलं. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, बडोद्या येथील दिवाळपुरा येथील एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच मित्रावर चाकूने सपा सप वार केले. या अल्पवयीन मुलाने दिशांत राजपुत नावाच्या मुलाला दिवाळपुरा भागात फिरायला बोलवलं. तेव्हा हल्लेखोराने त्याच्या मित्रांनाही सोबत आणले होते. तेथे मारेकऱ्यांच्या साथीतादारने दिशांतवर चाकूने हल्ला केला.(Crime News)
हत्येचं कारण सविस्तर-
दिशांत राजपूतचं मित्रमंडळ बरंच मोठं होतं. त्याला अनेक मित्र मैत्रीणी होत्या. तो सतत मित्र मैत्रीणींसोबत असायचा. यावेळी आरोपी मित्र हे ट्युशनला जायचे, तेव्हा त्यावेळी दिशांत आरोपीला गर्लफ्रेंड नसण्यावरून सतत चिडवायचा. हाच राग डोक्यात ठेवून आरोपींनी दिशांतचा काटा काढला. आरोपींची नुकतीच बारावी झाली होती. ते अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलीये. (Crime News)
पोलिसांनी आरोपी आणि इतर मारेकरी साथीदाऱ्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.
News Title – Crime News Minor Boy Killed His Friend After His Teased Him For Not Have Girlfriend
महत्त्वाच्या बातम्या
बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद
‘त्या’ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत; संजय दत्तचेही नाव समोर आल्याने खळबळ
पुरुषांपेक्षा महिला डॅाक्टरांनी उपचार केल्यास मृत्यू दरात घट, नव्या अभ्यासातून खुलासा
450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; पंकजा मुंडेंकडे एकूण संपत्ती किती?
मी स्वत:ला पुरस्कारासाठी कधीच पात्र समजत नाही; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?






