संतोष देशमुख यांचा हत्येचा व्हिडीओ समोर, कोर्टात काय घडलं?

On: December 13, 2025 5:28 PM
Santosh Deshmukh
---Advertisement---

Santosh Deshmukh |  छत्रपती संभाजीनगर खंडपीठात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण खून प्रकरणाची सुनावणी झाली. या अत्यंत संवेदनशील खटल्यामध्ये, सरकारी पक्षाने वाल्मीक कराड (Valmik Karad) आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कोणत्या क्रूर पद्धतीने हत्या केली, याबद्दलचे महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

न्यायालयात खटल्याची पुढील दिशा-

दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर, विशेष मोका (MCOCA) न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. या दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आला. हा चित्तथरारक पुरावा पाहिल्यानंतर, तिथे उपस्थित असलेले देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांना अश्रू आवरले नाहीत.

आजच्या सुनावणीत अभियोग पक्षाने विशेष मोका न्यायालयात सादर केलेल्या ध्वनी रेकॉर्डिंगच्या पुराव्यावर सुमारे एक तास महत्त्वाचा युक्तिवाद झाला. हा युक्तिवाद अभियोग पक्ष आणि आरोपींचे वकील यांच्यात झाला. परिणामी, खटल्यातील दोषारोपपत्र निश्चित करण्याची अपेक्षित असलेली प्रक्रिया आता १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीमध्ये (Santosh Deshmukh) पार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या खटल्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाचा युक्तिवाद यापूर्वीच पूर्ण झालेला आहे.

पुराव्यांवर आक्षेप आणि युक्तिवादातील विलंब

आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाकडून निशाणी १०० नुसार एक अतिरिक्त पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला. यावर आरोपींच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला की, फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी दिलेला डेटा (Santosh Deshmukh) मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये कॉपी करण्यात आला आहे आणि सरकारी पक्ष वेळोवेळी जे नवीन पुरावे सादर करत आहे ते आपल्याला वेळेत उपलब्ध होत नाहीत.

यावर विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. सरकारी पक्षाच्या वकिलांनी आरोपींकडून जाणीवपूर्वक सुनावणीची तारीख वाढवून खटल्याला विलंब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा स्पष्टपणे मांडला. अॅड. निकम यांनी ‘नाटक सुरू असल्याच्या’ मुद्द्यावर आरोपी पक्षाच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. याशिवाय, मागील सुनावणीनुसार तपास यंत्रणांनी घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या शोधाबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि तपास-

या खटल्यातील बाजू विशेष सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी मांडली, तर आरोपींचे प्रतिनिधित्व अॅड. दिग्वीजय पाटील आणि अॅड. विकास खाडे यांनी केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश पटवदकर यांनी पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश दिले.

सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२० रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या खुनासह ‘अवादा’ कंपनीला खंडणी मागणे आणि याच कंपनीच्या प्रकल्पावरील वाद अशा एकूण तीन प्रकरणांचा एकत्रित तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाने केला आहे.

या हत्याकांडातील आरोपींमध्ये वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांचा समावेश आहे. हत्येची घटना होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला असला तरी, अद्याप आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित झालेले नाही.

News Title – Court Trial Update Santosh Deshmukh Murder Case

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now