सर्वात मोठी बातमी! कॉँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

On: March 10, 2025 9:46 AM
Congress leader Ravindra Dhangekar resigns
---Advertisement---

Congress | विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला जणू गळतीच लागली आहे. अनेक बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले.आता कॉँग्रेसमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Congress)

कॉँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी कॉँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज (10 मार्च ) त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

त्यांनी यावेळी पक्ष सोडण्यामागील करण देखील सांगितले. कॉँग्रेस सोडताना मला दुःख होतंय, असंही धंगेकर म्हणाले. ते एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

रवींद्र धंगेकर यांचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून धंगेकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या WhatsApp स्टेटसवर भगवं उपरणं दिसल्यानंतर चर्चांना अधिक उधाण आलं. त्यांनी स्पष्ट केलं की, “सत्तेशिवाय लोकांची कामं करता येत नाहीत, त्यामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला.”

ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी आमदार असतानाही मला मदत केली होती. ते आणि उदय सामंत (Uday Samant) वारंवार संपर्कात होते. त्यामुळे लोकांच्या विकासासाठी मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.”

Title : Congress leader Ravindra Dhangekar resigns

Join WhatsApp Group

Join Now