Russell Brand | प्रसिद्ध ब्रिटिश कॉमेडियन आणि अभिनेता रसेल ब्रँड याच्यावर बलात्कार व लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, चार वेगवेगळ्या महिलांच्या तक्रारीनंतर सखोल तपासानंतर रसेल ब्रँडवर बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणं 1999 ते 2005 या काळातील असल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर ब्रँडचं स्पष्टीकरण
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रसेल ब्रँडने अखेर मौन सोडत स्वतःचा बचाव केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याने स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी लहानपणी आणि माझ्या तरुणपणी फार भटक्या स्वभावाचा होतो. त्या काळात मी अनेक चुकीच्या सवयी अंगीकारल्या होत्या. मी ड्रग्स आणि सेक्सच्या व्यसनात होतो. मात्र, मी कधीही कोणावर बलात्कार केला नाही किंवा कोणत्याही बळजबरीच्या गोष्टीत सहभागी झालो नाही,” असं स्पष्ट करत त्याने आपली भूमिका मांडली आहे.
ब्रँडच्या या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण त्याचं समर्थन करत असताना, अनेकजण त्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. या संपूर्ण प्रकरणाने रसेल ब्रँडच्या करिअरवर आणि प्रतिमेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
करिअरची सुरुवात
रसेल ब्रँडने आपल्या करिअरची सुरुवात रेडिओ आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमधून केली होती. त्याने काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. 2010 मध्ये त्याने प्रसिद्ध गायक कॅटी पेरीसोबत विवाह केला होता, मात्र काही वर्षांतच हे नातं संपुष्टात आलं.
पोलिस तपास सुरू असतानाच, रसेल ब्रँडवर समाजमाध्यमांवरून मोठा दबाव आहे. त्याच्या लाखो चाहत्यांमध्ये या प्रकरणामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ब्रँडविरोधातील ही चौकशी आणि त्याच्यावरील आरोप यामुळे त्याचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही मोठ्या वळणावर येऊन ठेपले आहे. पुढील तपासातून नेमकं काय निष्पन्न होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Title : comedian and actor russell brand breaks silnece on charged with rape and physical offences






