मुख्यमंत्र्यांनी 74 कोटीचा घोटाळा केला; कोणी केला आरोप?

On: November 18, 2024 2:27 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मेट्रोच्या कामावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेंवर केला मोठा आरोप :

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत मेट्रोच काम पूर्ण होण्याआधीच रंगरंगोटीच्या कामातून घोटाळा केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच मुंबई MMRDA क्षेत्रात मेट्रोची काम सुरु आहेत. त्यामुळे अनेक कामं पूर्ण देखील झालेली नाहीत. तसेच मेट्रोचे जे खांब आहेत, त्यांना काम पूर्ण होण्याआधीच गर्डर लागण्याआधीच रंगवून टाकल असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत केला आहे.

तसेच या खांबांना गर्डर लागल्यानंतर पुन्हा नुकसान मग पुन्हा रंगवायचं का? तसेच रंग कुठले वापरले आहेत? याशिवाय तुम्ही तुमचं घर बनवताना भिंत बनवताना अर्धवट कामावर रंगरंगोटी करता का? तसेच अर्धवट कामावर रंगरंगोटी करण्यासाठी तब्बल 74 कोटी 41 लाख 92 हजार 179 रुपये उडवण्यात आले असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Eknath Shinde l सर्व घोटाळ्यांची चौकशी करु :

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, बीएसटीला, ग्रॅज्युईटीला, दिवाळी बोनस, पोलिसांच्या घरासाठी, कापूस, सोयाबीनसाठी सरकारकडे पैसे नाहीत. पण असे खर्च करण्यासाठी तब्ब्ल 74 कोटी आहेत. तसेच हा घोटाळा नाही तर काय? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

परंतु आमचं सरकार हे 23 तारखेला बनल्यानंतर या सर्व घोटाळ्यांची चौकशी करुन दोषी असतील त्यांच्यावर थेट कारवाई करु असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

News Title : cm eknath shinde done 74 crore scam Aaditya Thackeray allegation

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

शेकोट्या पेटल्या, राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार?; IMD चा महत्वाचा अंदाज

“या नेत्यानी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला” ठाकरेंच्या आरोपावर प्रतिउत्तर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी आहे की नाही?

शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री..; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now