CID फेम अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ

On: December 16, 2023 6:56 PM
CID Fame Vaishnavi Dhanraj
---Advertisement---

मुंबई | CID मालिकेसह विविध प्रसिद्ध मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा एक खळबळजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैष्णवी धनराज (Vaishnavi Dhanraj) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. तीने थेट पोलीस स्टेशनमधून रेकॉर्ड करुन हा व्हिडीओ टाकला आहे. तिचा इंडस्ट्रीतला मित्र हिमांशू शुक्लाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

नेमका काय प्रकार घडला?

वैष्णवी धनराजने आपल्या घरातील सदस्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. घरातील सदस्यांनी आपल्याला वाईट पद्धतीने मारहाण केल्याचा दावा तीने या व्हिडीओमध्ये केला आहे. व्हिडीओत ती आपल्या ओठांना मार लागल्याचं दाखवताना दिसत आहे, तसेच तिच्या हाताला देखील मार लागल्याचं दिसत आहे.

ठाण्याच्या काशीमिरा पोलीस ठाण्यात तीने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीचा भाऊ आणि आईविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे, मात्र या प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये न्यायालयाचा आदेश आल्याशिवाय तपास सुरु करता येत नाही तसेच आरोपींना अटक देखील करता येत नाही अशी माहिती समोर आली आहे.

व्हिडीओमध्ये वैष्णवीनं काय म्हटलंय?

“नमस्कार, मी वैष्णवी धनराज आहे. मी माझा मित्र हिंमाशू शुक्लाद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे. मला सध्या तुमच्या मदतीची फार गरज आहे. मी काशीमिरा पोलीस ठाण्यात आहे. मला माझ्या कुटुंबाने अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केलेली आहे, त्यामुळे मला तुमच्याकडे मदतीची मागणी करत आहे. मीडियापासून ते टीवी इंडस्ट्रीतील सर्वांनी मला मदत करा”, असं तीनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

 

कोण आहे वैष्णवी धनराज? CID-

वैष्णवीने 2008 मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्याच वर्षी ‘करम अपना अपना’ सुद्धा तिला मिळाली. 2009 मध्ये, वैष्णवी CIDमध्ये रुजू झाली आणि ‘ना आना इस देस लाडो’मध्ये सुद्धा दिसली. 2013 मध्ये लग्न केल्यानंतर ती परवरिश-कुछ खट्टी कुछ मिठ्ठी मालिकेत परतली. त्यानंतर ती मधुबाला-एक इश्क एक जुनून, बेगुसराय, महाभारत, किचन चॅम्पियन 4, इंडियाज गॉट टॅलेंट, क्राईम पेट्रोल, हम ने ली है-शपथ आणि फिअर फाइल्स इत्यादी कार्यक्रमांमध्ये दिसली.

वैष्णवीचं लग्न फार काळ टिकलं नाही-

वैष्णवी ‘बेपनाह’मध्ये माही अरोराची नावाची भूमिका साकारताना शेवटची दिसली होती. तिने डिसेंबर 2012 मध्ये नितीन सहरावतसोबत लग्न केलं होतं, मात्र ते फार काळ टिकलं नाही. त्यांनी जुलै 2015 मध्ये कायदेशीर पद्धतीने विभक्त होण्यासाठी अर्ज केला होता, जानेवारी 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

News Title: cid fame actress vaishnavi dhanraj video viral

महत्त्वाच्या बातम्या-

Uddhav Thackeray | ‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता’; उद्धव ठाकरे संतापले

Mumbai Indians | असा झाला Rohit Sharmaचा गेम!, समोर आली पडद्यामागची खरी कहाणी

Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, वॅगन-आर कारचा चक्काचूर

Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Urfi Javed च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now