नगरमध्ये मोठा राडा; निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजपचा गंभीर आरोप

On: June 8, 2024 12:21 PM
chitra wagh serious allegations on Nilesh Lanke supporter Rahul zaware
---Advertisement---

Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. निलेश लंके यांनी डॉ.सुजय विखे पाटलांचा पराभव करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नगरमध्ये लंके विरुद्ध सुजय विखे पाटील ही लढत अत्यंत चुरशीची झाली. मात्र, निकाल लागल्यापासून येथे मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे.

दोनच दिवसांपुर्वी निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यामुळे गावातील वातावरण अतिशय तापलं होतं. पारनेर येथील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

दहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारची तोडफोड करून झावरे यांना मारहाण करण्यात आली होती. आता या प्रकरणावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गंभीर आरोप केला असून निलेश लंके यांच्यावरही निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर)पोस्ट करत म्हटले आहे की, ये जंगलराज नही चलेगा… आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला.

चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली. हाती दहा-पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला. यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला. असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की,”या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार लंके आणि यांची नेता मोठ्ठया ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागेल. म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवता देखील आला पाहिजे. पण महविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली.त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही…झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील.”, असं चित्रा म्हणाल्या आहेत.

निलेश लंकेंच्या समर्थकावर गंभीर आरोप

या पोस्टद्वारे चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. दरम्यान, निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तर आता राहुल झावरे यांनीच आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप एका महिलने केलाय.गोरेगाव येथील विखे समर्थक प्रितेश पानमंद यांच्या पत्नी हर्षदा पानमंद यांनी राहुल झावरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. चित्रा वाघ यांनी देखील याबाबत आरोप केल्याने नगरमधील वातावरण अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.

News Title –  chitra wagh serious allegations on Nilesh Lanke supporter Rahul zaware

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; ऑनलाईन सेवा बंद राहणार

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा असणार खास; शपथविधी कधी व किती वाजता होणार?

राज्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाने दिला सतर्क राहण्याचा इशारा

आज या तीन राशींना पैशांची कमी भासणार नाही

Join WhatsApp Group

Join Now