Childhood obesity | सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणाची समस्या वाढत चालल्याचं चित्र आहे. मुलांना फास्ट फूडबद्दल देखील अधिक आकर्षण असल्याचं दिसून येतं. यामुळे पौष्टिक घटक मुलांना मिळत नाहीत. त्यातच आता मैदानी खेळ खेळणं देखील जवळपास बंद झालंय.
मुलांना टीव्ही, मोबाइल बघण्याची प्रचंड सवय लागली आहे. आई-वडिलांनी काळजी घेतली नाही तर, त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शारीरिक हालचाल, खाण्यापिण्याच्या पद्धती हे घटक आरोग्यावर परिणाम करत असतात. याची काही इतरही कारणे असू शकतात.
मात्र, या लठ्ठपणामुळे लहान मुलांचा विकास होत नाही. त्यांची ऊंची तसंच प्रतिकार क्षमता यावर वाईट परिणाम होत असतो. यामुळे आरोग्याच्या देखील अनेक समस्या वाढतात.या लेखात लठ्ठपणाची कारणे आणि त्याचे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
लठ्ठपणामुळे ‘या’ आजारांचा धोका वाढतो
लहान मुलांमधील लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, यामुळे ते लहान वयातच लठ्ठपणाचे बळी ठरू शकतात. डॉक्टरांच्या मते, चांगली गोष्ट म्हणजे बालपणातील लठ्ठपणा टाळता येतो आणि कमीही करता येतो. यासाठी जीवनशैलीत अनेक महत्त्वाचे बदल करावे लागतील.
लठ्ठपणामुळे मुलांच्या सांध्यावर (Childhood obesity) आणि हाडांवर खूप दबाव येतो, ज्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये फॅटी लिव्हरचा धोकाही वाढतो. लठ्ठपणामुळे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.
‘अशी’ घ्या काळजी
या सर्व आजारांपासून जर आपल्या मुलांना दूर ठेवायचे असेल तर पालकांनी मुलांना दररोज व्यायाम करायला सांगितले पाहिजे.पार्कमध्ये जाऊन खेळले पाहिजे आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी झाला पाहिजे. अशा परिस्थितीत मुलांच्या आहारकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यांना फास्टफूड शकतो देऊच नये. या (Childhood obesity) छोट्या-छोट्या गोष्टी केल्या तर तुमचे मूल नक्कीच फिट अँड फाईन जीवन जगेल.
News Title- Childhood obesity causes
महत्वाच्या बातम्या-
राज्यात मॉन्सून दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, हवामान विभागाकडून महत्वाचा सल्ला
“देवेंद्र फडणवीस पळणारा माणूस नाही, मी निराश झालो असं समजू नका”
मोठी बातमी! बच्चू कडू यांचा महायुतीला धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय
‘अॅनिमल’ फेम तृप्ती डीमरीने मुंबईत घेतलं आलिशान घर; किंमत कोटींच्या घरात
“वसंत दादांचा नातू निवडून आलाय, त्यामुळे ठाकरेंची..”; विशाल पाटलांचं वक्तव्य चर्चेत






