Pune Porsche Accident l देशभर पुणे हिट अँड रन प्रकरण चांगलच गाजलं आहे. कारण या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे अग्रवाल कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात आहेत. कल्याणीनगर भागात 18 मे ला भरधाव वेगाने पोर्शे कारने दोन इंजिनिअर तरुणांना चिरडल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालसह त्याचे वडील आणि आजोबांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर :
या प्रकरणात बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाने देखील हातभार लावला आहे. प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवत अनेक गोष्टी गुपित ठेवल्या. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करता सर्व खुलासे झाले आहेत. या घटनेत पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर्सना देखील अटक करण्यात आली आहे. कारण डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलवले होते. त्यावेळी डॉक्टरांनी आरोपीचे बल्ड सॅम्पल चक्क कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले होते. याप्रकरणी डॉक्टरांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेत आरोपीने दारु प्राशन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पब पार्टीमध्ये आरोपी वेदांत दारु पित असल्याचे फोटो सुद्धा समोर आले होते. तसेच ब्लड सॅम्पलमुळे आरोपी घटनेच्यावेळी दारुच्या नशेत होता की नाही? हे समजणार होतं. मात्र त्यामुळे चक्क ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला आहे. अशातच आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा केली आहे.
Pune Porsche Accident l मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले निर्देश?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार याना दिले आहे.
तसेच या प्रकरणात गुन्हेगाराचे कलम वाढवता येईल का? यावर देखील वरिष्ट पातळीवर विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. या सर्व घटनेमध्ये बिल्डर,आमदार, खासदार, मंत्री अगदी कोणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना देखील आरोपी करा. कारण समाजामध्ये या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
News Title – Chief Minister Eknath Shinde’s order to Pune Police Commissioner regarding Porsche car accident
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून अभिनेता इम्रान खानने केला घटस्फोट; तब्बल 5 वर्षांनी केला खुलासा
मलायकाने भररस्त्यात केलं असं काही की… व्हिडीओ तूफान व्हायरल
तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट
मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप
मासिक पाळीदरम्यान ‘या’ अभिनेत्रींना होतो प्रचंड त्रास; केली मोठी मागणी






