कॅफे गुडलक प्रकरणानंतर पुण्यातील ‘या’ हॉटेलमधील किळसवाणा प्रकार उघडकीस!

On: July 19, 2025 11:23 AM
pune
---Advertisement---

Pune | पुण्यातील (Pune) हिंजवडी (Hinjawadi) परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या ताटात कोंबडीचे पिस आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रदीप नाईक (Pradip Naik) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (FDA) लेखी तक्रार दाखल केली असून, पुण्यातील हॉटेलमधील स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना १६ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास (Pune) हिंजवडी-मारुंजी रस्त्यावरील अरेबियन मंडी हॉटेलमध्ये (Arabian Mandi Hotel) घडली. प्रदीप नाईक हे जेवणासाठी गेले असता, त्यांना हॉटेलमध्ये प्रवेशापासूनच अस्वच्छतेचा अनुभव आला. पार्किंगची अव्यवस्था, अस्वच्छ जेवणाची जागा, तेलकट टेबल-खुर्च्या आणि अत्यंत खराब हात धुण्याची सोय असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ताटात कोंबडीचे पिस-

जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर, नाईक ‘निजाम चिकन कबाब’ खात असताना त्यांच्या ताटात चक्क कोंबडीचे पिस आढळून आले, ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ मॅनेजरला बोलावून जाब विचारला असता, मॅनेजरने वाद टाळण्यासाठी “काही बोलू नका, बिल देऊ नका” असा सल्ला दिला. मात्र, नाईक यांनी हॉटेल प्रशासनाची ही भूमिका नाकारली.

प्रदीप नाईक यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत ४८२ रुपयांचे संपूर्ण बिल दिले आणि हॉटेलच्या भोंगळ कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. या घटनेमुळे पुण्यातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील स्वच्छतेचा आणि पदार्थांच्या दर्जाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

News Title – Chicken Feather Found in Food at Pune Hotel

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now