Chhava | ‘छावा’ (Chhava) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. शूरवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
विशेष म्हणजे, 7 मार्च रोजी हा चित्रपट दक्षिण भारतात तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला असून, तिकडेही त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
संतोष जुवेकरने शेअर केला व्हिडिओ
मराठी अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar), जो ‘छावा’ मध्ये रायाजी या भूमिकेत झळकला आहे, त्याने एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये तेलुगू प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर दिलेल्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन दिले की, “7 मार्चला तेलुगू भाषेत ‘छावा’ प्रदर्शित झाला. तिकडच्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया तुमच्यासोबत शेअर करतोय. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!”
‘छावा’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
संतोष जुवेकरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटगृहाबाहेर गर्दी, जल्लोष आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला दाद देणाऱ्या प्रतिक्रिया दिसून आल्या. सोशल मीडियावर युजर्सनी कमेंट करत ‘छावा’ सगळ्या भाषांमध्ये डब करायला हवा असे मत व्यक्त केले. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘छावा’ चित्रपटाबद्दल थोडक्यात
या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी केले असून यामध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराज तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय अक्षय खन्ना (Akshaye Khanna) हा औरंगजेब याच्या भूमिकेत दिसला. तसेच संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, आशुतोष राणा यांच्या देखील यामध्ये प्रमुख भूमिका आहेत.
View this post on Instagram
Title : Chhava Movie Craze in South India Santosh Juvekar share Video








