Sexual Relations | छत्तीसगड उच्च न्यायालयाने (Chhattisgarh High Court) सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले की, सज्ञान पत्नीसोबत तिच्या संमतीशिवाय किंवा संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा बलात्कार किंवा अनैसर्गिक संबंध (Sexual Relations)मानला जाऊ शकत नाही. म्हणजेच, लैंगिक संबंध किंवा अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीची संमती आवश्यक नाही.
या निर्णयानुसार, न्यायालयाने एका व्यक्तीवरील आरोप फेटाळून लावत त्याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि 304 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवले नाही. तसेच, न्यायालयाने आरोपीला तत्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने काय म्हटले?
न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, जर पत्नीचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसेल, तर पतीने पत्नीसोबत केलेले कोणतेही लैंगिक कृत्य बलात्कार म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत, अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीच्या संमतीची आवश्यकता नाही. या आधारावर न्यायालयाने आरोपीला IPC च्या कलम 376 आणि 377 अंतर्गत दोषी ठरवले नाही.
काय होते प्रकरण?
हे प्रकरण 11 डिसेंबर 2017 चे आहे, जेव्हा 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले होते. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेने मृत्यूपूर्वी जबाब दिला होता की पतीने तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवले होते आणि डॉक्टरांनी सांगितले होते की महिलेचा मृत्यू अनैसर्गिक लैंगिक संबंधांमुळे झाला आहे.
परंतु आता उच्च न्यायालयाने असे मानले आहे की जर पत्नीचे वय 15 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तिच्यासोबत केलेले लैंगिक (Sexual Relations) कृत्य बलात्कार मानले जाऊ शकत नाही. याव्यतिरिक्त, न्यायालयाने हे देखील मानले की अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा मानला जाऊ शकत नाही. या निर्णयानंतर उच्च न्यायालयाने पतीला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. यापूर्वी ट्रायल कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
हा निर्णय भारतातील वैवाहिक बलात्काराच्या (Marital Rape) प्रकरणांमध्ये कायदेशीर स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. भारतात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होत नाही आणि आता या निर्णयामुळे अनैसर्गिक लैंगिक संबंधांनाही शिक्षेच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आले आहे.
Title : Chhattisgarh High Court’s Landmark Decision Sexual Relations with Wife Not Rape






