छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसाचं अश्लील कांड, महिला अंमलदारासोबत…

On: April 30, 2025 8:39 PM
chhatrapati sambhajinagar
---Advertisement---

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत पोलीस निरीक्षकाने आक्षेपार्ह वर्तन केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याने मात्र आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.

महिला अंमलदाराचा आरोप –

या प्रकरणी एका ३४ वर्षीय महिला अंमलदाराने बेगमपुरा पोलीस ठाण्यात (Begumpura Police Station) फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, ९ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजता त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यात आला व एक छायाचित्र पाठवण्यात आले. मात्र, ते छायाचित्र पाठवणाऱ्याने (आरोपाप्रमाणे निरीक्षक अशोक भंडारे (Ashok Bhandare)) लगेचच डिलीट केले.

पीडित अंमलदाराने (Chhatrapati Sambhajinagar) हा क्रमांक कोणाचा आहे, अशी विचारणा केली असता, त्यांना कथितरीत्या आक्षेपार्ह संदेश मिळाला. त्यानंतर पुन्हा तेच छायाचित्र पाठवून आणखी एक आक्षेपार्ह संदेश पाठवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशोक भंडारे हे आपले प्रभारी अधिकारी नसतानाही त्यांनी रात्री उशिरा संपर्क साधून छायाचित्रे व संदेश पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असा आरोप पीडितेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अधिकाऱ्याची बाजू-

गुन्हा दाखल झालेले पोलीस निरीक्षक अशोक भंडारे (Chhatrapati Sambhajinagar) यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असून, ते द्वेषभावनेतून किंवा गैरसमजातून केले गेले असावेत, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण निर्दोष असून चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, आणि तपासात सत्य समोर येईल, असा विश्वास भंडारे यांनी व्यक्त केला आहे.

विशेष बाब म्हणजे, ज्या दिवशी ही कथित घटना घडली, त्याच्या आदल्या दिवशीच पोलीस निरीक्षक भंडारे यांना उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस महासंचालकांचे (Director General of Police – DGP) सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

News Title – Chhatrapati Sambhajinagar Officer Accused of Molestation Denies Charges

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now