महायुतीत वादाची ठिणगी?, भुजबळ पुन्हा कडाडले

On: May 31, 2024 2:20 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Chhagan Bhujbal | मनुस्मतीतील काही श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. काही नेत्यांकडून आनावधानाने काही गोष्टी देखील घडल्या गेल्या. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनुस्मृतीविरोधात आपलं लक्ष केंद्रीत केलं. मनुस्मृतीला विरोध करणारंच असं त्यांनी जाहीर केलं आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडणार का?, अशी चर्चा रंगली आहे.

महायुतीत धसफूस?

महाविकास आघाडीसोबत आता महायुतीतील काही नेते हे मनुस्मृतीच्या विरोधात आहेत. यामुळे आता महायुतीत धुसफूस सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नौटंकी करत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

कोणत्याही प्रकारचा समावेश केला जाणार नसल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. त्यानंतर भुजबळ यांनी मनुस्मृतीचे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये कोणतेही चंचूप्रवेश नको असल्याचं वक्तव्य केलं आहे.

“मनुस्मृतीचा चंचूप्रवेश शाळेत होता कामा नये”

माझा मुद्दा असा आहे की, मनुस्मृतीचा चंचूप्रवेश हा शाळेत होता कामा नये. त्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाडांबाबत वक्तव्य केलं आहे. भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधकांनी जरूर विरोध करा आम्हाला हरकत नाही. पण मनुस्मृती जाळा कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. आमची भूमिका ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांची असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महाड येथील चवदार तळ्यावर चूक झाली का?, असा सवाल केला असता त्यावर भुजबळ यांनी यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही सांगू झाली चूक. ते मुंबईवरून महाडला गेले. तेव्हा त्यांची भूमिका ही मनुस्मृती जाळणं होती. त्यांचं चुकलं, त्यांना काही शिक्षा करायची ती करा, असं भुजबळ म्हणाले आहेत.

तुम्ही याप्रकरणावर नाराज आहात का?, असा सवाल भुजबळ यांना केला असता त्यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज नाही. मी शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पाईक आहे. मी अशा विषयांवर स्पष्टपणे बोलतो, असंही ते म्हणाले आहेत.

News Title – Chhagan Bhujbal On Manusmriti Controversy News Update

महत्त्वाच्या बातम्या

गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी घसरलं; जाणून घ्या आजचे दर

घराबाहेर पडण्यापुर्वी विचार करा! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

निकालाआधीच पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर!

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर अजितदादांच्या ‘या’ आमदाराचा प्रभाव; प्रांताधिकाऱ्याने केला गंभीर आरोप

पुणेकरांनो सावधान! शहरातील ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत बदल, असा असणार पर्यायी मार्ग

Join WhatsApp Group

Join Now