‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला, मौलानांच्या मागणीने खळबळ 

On: March 21, 2025 2:49 PM
Chhaava Movie Ban Demand 
---Advertisement---

Chhaava Movie Ban | सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला ‘छावा’ चित्रपट हा नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. मुघल बादशाह औरंगजेबाच्या चित्रणावरून काही मुस्लिम धर्मगुरूंनी हा चित्रपट देशात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप करत बंदीची मागणी केली आहे. (Chhaava Movie Ban)

नागपूर दंगलीसाठी चित्रपटाला जबाबदार धरलं

ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘छावा’ चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाचं जे स्वरूप दाखवलं आहे, त्यामुळे देशातील तरुणांची माथी भडकवली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपूर (Nagpur) शहरात नुकत्याच उसळलेल्या दंगलीसाठी हा चित्रपटच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रझवी यांच्या मते, चित्रपटात इतिहासाचे विकृत चित्रण केल्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असून अशांततेचे वातावरण पसरले आहे. यावर कठोर कारवाई करत फक्त चित्रपटावर बंदीच नव्हे, तर त्याचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवरही (Filmmakers) कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

औरंगजेब आदर्श नाही, फक्त मुघल शासक – मौलानांचा खुलासा

मौलाना रझवी यांनी स्पष्ट केलं की, “भारतातील मुस्लीम औरंगजेबाला आपला आदर्श मानत नाहीत. आम्ही त्याला एक मुघल शासक म्हणून पाहतो, त्यापेक्षा अधिक काही नाही.” त्याचबरोबर त्यांनी नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक उलेमा व इमाम यांच्याशी संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं. (Chhaava Movie Ban)

नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले असून, फहिम खान या प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर मुस्लिम समुदायाकडून ‘छावा’ चित्रपटावर बंदीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

Title : Chhaava Movie Ban Demand 

 

Join WhatsApp Group

Join Now