Chhaava Box Office | विक्की कौशलच्या ‘छावा’ने रिलीजनंतर 42 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर कमाई कायम ठेवली आहे. नव्याने आलेल्या ‘एल2एम्पुरान’सारख्या चित्रपटांच्या स्पर्धेचीही त्याच्या यशावर छाया पडलेली नाही. आता ‘छावा’ 600 कोटींच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. (Chhaava Box Office)
‘छावा’ची 42 व्या दिवशी 1.4 कोटींची कमाई
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित ‘छावा’ (Chhaava Movie) या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विक्की कौशल (Vicky Kaushal) याच्या दमदार अभिनयाने सजलेला हा सिनेमा दीड महिना उलटूनही थिएटरमध्ये तितकाच प्रभावी ठरत आहे. सहाव्या आठवड्यातसुद्धा रोज कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटानं 42 व्या दिवशीही 1.4 कोटी रुपयांची कमाई केली, असा रिपोर्ट समोर आलाय.
‘छावा’ने आतापर्यंत एकूण 589.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून, हे 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरत आहे. आठवड्यानुसार कमाई पाहता, पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी, चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी, आणि पाचव्या आठवड्यात 33.35 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
‘एल2एम्पुरान’चा परिणाम नाही, पण ‘सिकंदर’ ठरू शकतो गेमचेंजर
‘छावा’ची लोकप्रियता इतकी आहे की, मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या ‘L2Mpuran’ या साऊथ ब्लॉकबस्टरनेदेखील त्याच्या कमाईवर फारसा परिणाम केलेला नाही. 42 व्या दिवशीही ‘छावा’नं कोटींचा गल्ला जमवून हे सिद्ध केलं आहे. मात्र 30 मार्च रोजी सलमान खानचा ‘सिकंदर’ (Sikandar) प्रदर्शित होत असून, त्याला मिळणाऱ्या बंपर ओपनिंगमुळे ‘छावा’च्या कमाईला ब्रेक लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तथापि, सध्याच्या ट्रेंडनुसार ‘छावा’ 600 कोटींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे आणि तो लवकरच पार होण्याची शक्यता आहे. हा टप्पा गाठल्यानंतर ‘छावा’ 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरेल, हे नक्की.
Title : Chhaava Box Office Inches Closer to 600 Cr








